मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील सुतार प्रकरणात इंटरनॅशनल अँड ज्युनिअर कॉलेज स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत या रॅकेटचा मास्टरमाईंड रविराज कोडकीर (रा. सांगली) याला अटक केली आहे.
दरम्यान, संबंधित शाळेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्र व शाळेच्या ओळखपत्रांची तपासणी सुरू होती.

त्यावेळी केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ली यांनी तपासणी केली असता दहा विद्यार्थी तोतया असल्याचे उघड झाले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ली यांच्या फिर्यादीवरून मूळ दहा विद्यार्थी आणि त्यांच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेले दहा तोतया विद्यार्थी अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच एका मुलीसह दहा तोतया विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पुढील तपासात या प्रकरणामागील मास्टरमाईंड रविराज कोडकीर याचा शोध घेऊन त्याला सांगली येथून ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे कोडकीर हा लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल अँड ज्युनिअर कॉलेज स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













