mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 18, 2026
in मनोरंजन, राष्ट्रीय
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

काल मंगळवारी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यात पाल्लेकेले येथे होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे झिम्बाब्वेला मात्र फायदा झाला.

हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळाला. त्यामुळे झिम्बाब्वेचे ५ पाँइंट्स झाले आणि त्यांनी बी गटातून सुपर-८ फेरीत प्रवेश मिळवला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ मात्र स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यांनी आयर्लंडला हरवलं होतं, पण त्यांना झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, झिम्बाब्वेने सुपर-८ मध्ये प्रवेश केल्याने भारताच्या मार्गातील ऑस्ट्रेलियाचा काटाही दूर झाला आहे. कारण जर ऑस्ट्रेलिया सुपर ८ साठी पात्र ठरले असते, तर भारताच्या गटातच आले असते. मात्र आता त्यांची जागा झिम्बाब्वे घेणार आहे.

खरंतर पहिल्या फेरीपूर्वीच चारही गटातील प्रत्येकी दोन बलाढ्य संघांना (क्रमवारीत वरचढ असलेल्या) मानांकन देण्यात आले होते. या मानांकनानुसार सुपर -८ मधील दोन गटात प्रत्येकी ४ संघांची विभागणी झाली होती.

मात्र जर मानांकन असलेल्या संघांपैकी जर कोणता संघ सुपर ८ मध्ये पोहचला नाही, तर त्या संघाच्या गटातील जो दुसरा संघ सुपर -८ साठी पात्र ठरला आहे, तो संघ मानांकन असलेल्या संघाची जागा घेणार, असं नियमात होतं.

यानुसार ऑस्ट्रेलियाला आणि श्रीलंका या दोन्ही संघांना बी गटातून मानांकन होतं. त्यांना सुपर – ८ साठी वेगवेगळ्या गटात ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलिया बाहेर गेल्याने, त्यांची जागा आता झिम्बाब्वे घेईल.

त्यामुळे आता सुपर – ८ साठी भारतीय संघ ज्या गटात आहे, त्या गटाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. त्यामुळे भारतीय संघही कोणत्या संघाविरुद्ध कधी सुपर – ८ सामने खेळणार हे देखील ठरले आहे. भारतालाही अ गटातून मानांकन मिळाले होते.

भारतासोबत सुपर – ८ मध्ये एकाच गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहे. त्यामुळे भारतीय संघ आता या तीन संघांविरुद्ध खेळून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत.

भारताचे सुपर – ८ मधील सामने

भारतीय संघाचा पहिल्या फेरीतील नेदरलँड्सविरुद्धचा एक सामना अद्याप बाकी आहे, हा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादला होईल. त्यानंतर भारतीय संघ सुपर – ८ मधील पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादला सामना खेळेल.

यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा दुसरा सामना २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होईल. तिसरा सामना कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ खेळेल. भारताचे हे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत.

भारताचे सुपर-८ चे वेळापत्रक

२२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद (वेळ: संध्या. ७ वा.)

२६ फेब्रुवारी – भारत विरुद्ध झिम्बाब्वे, चेन्नई (वेळ: संध्या. ७ वा.)

१ मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता (वेळ: संध्या. ७ वा.)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारतीय क्रिकेट टीम

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 30, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
Next Post
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा