मंगळवेढा टाइम्स न्युज।
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच मंगळवेढा तालुक्यातील सर्वच गट व पक्षातून राजकीय हालचाली वेगाने घडू लागल्या असून गट व गणातून कोणाला उमेदवारी द्यायची याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण कोणाबरोबर युती करणार याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांचे मुलाखती घेऊन चाचपणी सुरू केली आहे.

मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेचे संत दामाजीनगर, हुलजंती, भोसे, लक्ष्मी दहिवडी हे 4 गट व पंचायत समितीचे संत दामाजीनगर, हुलजंती, बोराळे, मरवडे, भोसे, संत चोखामेळानगर, रड्डे, लक्ष्मी दहिवडी हे 8 गण आहेत.

चार जिल्हा परिषद गटांपैकी एकमेव भोसे हा गट सर्वसाधारण असून अन्य सर्व तीन गट ओबीसी, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव आहेत.

आठ पंचायत समिती गणापैकी रड्डे अनुसूचित जाती, भोसे व लक्ष्मी दहिवडी सर्वसाधारण, तर बोराळे, संत चोखामेळानगर व मरवडे हे तीन गण सर्वसाधारण महिला

तर संत दामाजीनगर ओबीसी महिला व हुलजंती ओबीसी आहे. 4 जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गण मिळून एकूण 1 लाख 69 हजार 536 मतदार आहेत.

दरम्यान, अद्यापही मुलाखती घेतल्या जात असून कोणाला शब्द तर कुणाला कामाला लागा असा आदेश काहींनी दिला असल्यामुळे इच्छूक उमेदवार सलाईनवर असल्याचे चित्र दिसत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














