mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! राज्य सरकारला दणका; अखेर ‘ते’ परिपत्रक केलं रद्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 25, 2025
in राज्य, राष्ट्रीय
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

जमीन संपादनाच्या भरपाईसंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या 24 जानेवारी 2023 च्या परिपत्रकावर मुंबई उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले असून, हे परिपत्रक घटनाविरोधी ठरवले आहे.

या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला असून, हजारोशेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने या परिपत्रकाच्या आधारे ठरविण्यात आलेली भरपाई बेकायदेशीर ठरवून, संबंधित प्रकरणांमध्ये नव्याने भरपाई निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

प्रकरण काय होतं?

न्या. गिरीशकुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनीयाचिका दाखल केली होती. या याचिकेत महसूल व वनविभागाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

या परिपत्रकानुसार, जमीन संपादनाच्या प्राथमिक अधिसूचनेपूर्वीच्या एका वर्षातील खरेदी-विक्री व्यवहार बाजारभाव ठरवताना वगळण्याचे निर्देश देण्यात आले होते. परिणामी, जमिनीचा प्रत्यक्ष बाजारमूल्यापेक्षा कमी दर ठरवून शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई देण्यात आली.

निर्णय काय?

न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले की, हे परिपत्रक म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदाआणणारे असून, त्यांना न्याय्य आणि योग्य भरपाई मिळण्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणारे आहे.

2013 च्या जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायद्यात शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्या कार्यकारी आदेशाच्या माध्यमातून कमी करता येत नाहीत, असेही न्यायालयाने ठामपणे सांगितले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या वादग्रस्त परिपत्रकाच्या आधारे दिलेली सर्व भरपाई बेकायदेशीर मानली जाईल. अशा सर्व प्रकरणांमध्ये 2013 च्या कायद्यानुसार नव्याने भरपाई निश्चित करणे आवश्यक आहे.

तसेच, ज्या प्रकरणांमध्ये भरपाईविरोधात कोणत्याही प्राधिकरण किंवा न्यायालयापुढेअपील किंवा आव्हान प्रलंबित आहे, त्या संबंधित पक्षांना या निर्णयाचा आधार घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, हे माहीत असूनही असे परिपत्रक लागू करणारे अधिकारी कारवाईस पात्र ठरू शकतात, असे सूचक मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवरशिस्तभंगाची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

या निर्णयाचे परिणाम केवळ पुणे रिंग रोडपुरते मर्यादित राहणार नाहीत. राज्यातील महामार्ग, द्रुतगती मार्ग, रिंग रोड आणि इतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी जिथे या परिपत्रकाचा आधार घेऊन भरपाई ठरवण्यात आली आहे, त्या सर्व प्रकरणांवर या निकालाचा व्यापक प्रभाव पडणार आहे. अनेक शेतकऱ्यांना आता वाढीव भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकऱ्यांना दिलासा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
Next Post

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता सभागृहात मतदानाचा अधिकार, सरकारचा मोठा निर्णय; निर्णायक मतासह 2 मते देता येतील

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा