मंगळवेढा टाईम्स न्युज।
सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. करमाळा शहराच्या पश्चिमेला असलेल्या जवळच्या गावांमधील महिलेच्या पतीसह तिघांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

करमाळा-जामखेडदरम्यान करमाळालगत असलेल्या मात्र जामखेड तालुक्यात मोडणाऱ्या गावातील प्लम्बिंगचे काम करणाऱ्या एका तरुणाने याबाबत करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
करमाळा शहराच्या पश्चिमेला असलेल्या गावातील एका महिलेसोबत त्याची सोशल मीडियावर ओळख झाली.

गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यात फोनवर बोलणे चालू होते. २० डिसेंबर २०२५ रोजी त्या महिलेने फिर्यादी तरुणाला तिच्या गावी भेटण्यासाठी बोलाविले होते.

दुपारी १ वाजता तो तिच्या घरासमोर थांबला असता, त्या महिलेच्या पतीने माझ्या पत्नीची छेड काढतो काय?, असे म्हणत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले.

यावेळी तिथे असलेल्या इतर दोघांनीही फिर्यादी तरुणाला रबरी पाइपने डोक्यात तोंडावर पाठीवर मारून जखमी केले.

महिलेच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; हवालदार दीपक घोरपडे घटनेचा तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












