मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी तसेच शासनाकडून विविध योजनांचा लाभ- देण्यासाठी तसेच कृषी विभागाला गती देण्यासाठी – शासनाच्यावतीने जवळपास १ हजार ८८३ साली – कृषी विभागाची स्थापना करण्यात आली होती.

त्यावेळी खांद्यावर औजार घेतलेला शेतकरी हे बोधचिन्ह आणि ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ अशी कृषीविभाग टॅग लाईन अर्थात घोषवाक्य होते. मात्र शासनाने आता हे बोधचिन्ह आणि टॅग – लाईन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीच्या बोधचिन्हात बदल करुन नव्याने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हामध्ये उगवता सुर्य, गाय, विज्ञान, रोप आणि औद्योगिक विकास दाखविण्यात आला असून कृषी कल्याण आणि कर्तव्यमू विभाग असे नामकरण करुन शाश्वत शेती आणि समृध्द शेतकरी असे घोषवाक्य देण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय आता केवळ शेती आणि शेतकरी यांच्या पुरताच मर्यादीत राहिला नाही तर शेतीमध्ये नवी पहाट झाली असून उगवता सुर्य दाखविण्यात आला आहे तसेच शेतीला जोड व्यवसाय असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाला ही यामध्ये महत्व देण्यात आले आहे.

तसेच रोप दाखवून अनेक प्रकारात शेती विकसीत झाली आहे तर प्रयोग आणि विज्ञान दाखवून शेतीत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे या बोधचिन्हात दाखविण्यात आले आहे.

तसेच नव्याने जारी केलेले बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरण्याच्या सूचना ही आता शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














