mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैतानी वृत्ती! मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या; तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 19, 2025
in क्राईम, राज्य
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

हातकणंगले तालुक्यातील आळते इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबतच राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या केली.

हत्या करण्यापाठीमागचे कारण हे अतिशय धक्कादायक आहे. मदरसा बंद पडावा आणि सुट्टी मिळावी, गावी जाता यावं म्हणून आरोपी मुलाने त्याच्या सहकारी मुलाची अशा पद्धतीने हत्या केली आहे. हत्या झालेला अल्पवयीन मुलगा हा बिहारचा आहे तर हत्या करणाराही बिहारचाच असल्याचं समोर आलं आहे.

फैजनची इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आळते गावच्या माळरानावर धार्मिक शिक्षण देणारे मदरशा आहे. या मदरशामध्ये जवळपास 90 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यापैकी 70 विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत.

तर इतर मुलं राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आली आहेत. याच धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये फैजन नाजीम नावाचा अकरा वर्षाचा विद्यार्थी देखील शिक्षण घेत होता. मात्र त्याच्यासोबतच राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक शॉक देऊन फैजानची हत्या केली.

ज्या विद्यार्थ्याने हा प्रकार केला त्याने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फैजानच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा घातला. त्याच्यानंतर त्याच्या पायाला आणि हाताला इलेक्ट्रिक वायर बांधली. स्विच ऑन करून आरोपी मुलगा देखील झोपी गेला. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास नमाजसाठी मुलांना उठवण्यात आलं. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मदरसा बंद पडावा म्हणून कृत्य

या धार्मिक शिक्षण संस्थेतील प्रत्येक रूममध्ये 25 विद्यार्थी राहतात. 15 जून रोजी रात्री अकरा वाजता फैजानची हत्या केली. 16 जूनच्या पहाटे फैजान मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत संशय आल्याने संबंधितांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पण चौकशीत एक धक्कादायक बाब उघड झाली. हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलानं मदरसा बंद पडावा, सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी हे सगळं केल्याचं समोर आलं.

अल्पवयीन मुलानं गुन्हा कबुल केला आहे. पण या प्रकरणावर अजून काही मुलांची चौकशी सुरु आहे. ही हत्या कट रचून करण्यात आली आहे का? शॉक देण्यासाठी मुलानं वायर कुठून आणली? याचा शोध पोलिस घेत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जातं. मात्र अशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नव्हती अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

मदरशांवर धार्मिक वचक कुणाचा?

आळते या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे अशा पद्धतीने शिक्षण देणाऱ्या धार्मिक शिक्षण संस्थांवर नेमका कुणाचा वचक असणार? इथे येणारी मुलं परराज्यातून इतक्या मोठ्या संख्येने कशी काय येतात? त्यांच्या सुरक्षेचे काय होणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे. राज्यात धार्मिक शिक्षण देणाऱ्या अशा अनेक संस्था आहेत जिथे अल्पवयीन मुलं शिक्षण घेतात. मात्र अशा शिक्षण संस्थांचा कारभार व्यवस्थित चालतो का? तिथे बाल हक्क कायद्याचं उल्लंघन होतंय का? मुलांची पिळवणूक तर होत नाही ना? याची चौकशी होणं गरजेचं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विजेचा शॉकहत्या

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
Next Post
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले 'एवढे' गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा