mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी 36 तासात काय काय केलं? लष्कराला पूर्ण सूट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ तळं उद्धवस्त करण्यात आल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जवानांनी बदला घेतला.

यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.

भारताचे हे ऑपरेशन इथेच थांबणार नाही. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते सुरूच राहणार आहे, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ मंगळवारी रात्री १ च्या सुमारास सुरु झाले. त्यानंतर साधारण २५ मिनिटे हे ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. भारताची ही कारवाई केवळ एक ट्रेलर असून, खरा पिक्चर अजून बाकी आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.

सध्या ऑपरेशन सिंदूरमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनला ३६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपेरेशनच्या वेळेपासूनच सक्रिय आहेत. ते स्वतः या लष्करी कारवाईवर लक्ष ठेवून होते.

अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानतंर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जागतिक अंतराळ अन्वेषण परिषदेला संबोधित केले.

भारताची अंतराळ यात्रा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर एकत्रितपणे उंची गाठण्यासाठी आहे. भारत लवकरच एक विशेष जी-२० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

मोदींची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशनची माहिती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही त्यांना सांगितले. भारतीय लष्कराने तयारीनुसार कोणतीही चूक न करता ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराची खूप प्रशंसा केली.

यानंतर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या मोदी हे पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ते सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सीसीएसची बैठक घेऊन पाकिस्तानवर कठोर निर्णय घेतले.

लष्कराला पूर्ण सूट

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू जल करार रद्द केला होता. यासोबत, राजकीय संबंधांमध्ये कपात केली आणि पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद केला. पंतप्रधान मोदी एकीकडे ही कारवाई करत असताना दुसरीकडे बैठकांवर बैठका पार पडत होत्या.

या बैठकीत मोदी व्यस्त होते. ते सतत लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. यावेळी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पंतप्रधान मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.

भारताची सक्षमता आली दिसून

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र माऱ्यांना तत्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे संभाव्य हाणी टळली. यात भारताची संपर्क यंत्रणा आणि वायूदल किती दक्ष आहे याचाच प्रत्यय यानिमित्ताने आपल्या शत्रूराष्ट्राला आला आहे. या प्रतिसादाचे वर्णन क्लिनिकल आणि नियंत्रित असे करण्यात आले आहे, पश्चिम सीमेवरील उच्च तयारी दर्शवते.

कोणतीही जीवीतहाणी नाही

रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, पाकने क्षेपणास्त्र डागल्यानंतर कोणतीही नागरी जीवितहानी किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी प्रक्षेपणांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाचा पुढील तपास करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

गुरुद्वाराजवळ एक तोफगोळा पडला, ज्यामुळे त्याच्या बाह्य रचनेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुद्वाराच्या भिंतींवर गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संशयास्पद ड्रोन स्फोट

भारत-पाकिस्तान सीमेजवळ, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा भागात हाय-टेन्शन पॉवर लाईनशी आदळल्यानंतर एक संशयास्पद ड्रोन स्फोट झाला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामुळे मोठा सुरक्षा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या

ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ शहरातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून विनाकारण तोफगोळ्यांचा मारा केला. त्यानंतर फायरिंगही केली होती. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून गोळीबारासारख्या घटना आणि ड्रोनची घुसखोरी, सायबर हल्ले आणि सीमेलगत सुरु असलेल्या दहशतवादी हालचालीमुळे गुप्तचर संस्था अतिदक्षता बाळगून आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

भारताचा पाकिस्तानला दणका! पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली; पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा