mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताचा पाकिस्तानला दणका! पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली; पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2025
in राष्ट्रीय
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने गेल्या 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा भारतावर हवाई हल्ला चढवला आहे. सीमारेषेलगत असलेल्या जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवण्यात आला आहे.

याचा फटका हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्याला बसला आहे. धर्मशालात आज पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना होता. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली होती.

हा सामना सुरु असताना दहाव्या षटकात पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे धर्मशालात अचानक ब्लॅकआऊट करण्यात आला. त्यामुळे धर्मशाला येथील मैदानातील फ्लडलाईटस् बंद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सध्या सीमारेषेच्या परिसरात एकापाठोपाठ एक जोरदार हल्ले सुरु आहेत.

पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेपलीकडून क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत. मात्र, भारतीय सैन्याने सीमारेषेच्या भागात तैनात केलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल 70 आणि शिल्का या अँटी एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला आहे.

जैसलमेर, पठाणकोट, कछ भागात पाकिस्तानी डागलेली क्षेपणास्त्रंही भारतीय सैन्याने पाडली आहेत.

आतापर्यंत पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्रं भारतीय सैन्याने पाडल्याची माहिती आहे. याशिवाय, उरी आणि पोखरण परिसरात भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून एकमेकांवर जोरदार गोळीबार सुरु असल्याची माहिती

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या संपर्कात आहेत. संरक्षणमंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानने भारतातील नागरी वस्ती असलेल्या भागांवर हल्ला चढवल्याने आता युद्धाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आता भारत या हल्ल्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे बघावे लागेल.

जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर पाकिस्तानचा हल्ला

जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे.

भारतानं पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांना पाडलं

भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांना पाडलं आहे. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 पाडलं आहे. भारतानं राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 पाडलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान युद्ध सुरू

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

शेतकरी बांधवांनो! अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक; उद्या पिक विमा संदर्भातील लेखी तक्रारी घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा