mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताची रणनीती आणि देशवासियांच्या भावनांचा हुंकार; ऑपरेशन सिंदूर नावाची गोष्ट नेमकी काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेला एअरस्ट्राईक जितका लक्षवेधी होता, तितकंच लक्षवेधी होतं या मोहिमेचं नाव… ऑपरेशन सिंदूर. 26 महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा बदला घेणाऱ्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची.

भारताची रणनीती आणि देशवासियांची भावना यांचा मिलाफ साधणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाची ही गोष्ट.

ऑपरेशन सिंदूर… पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा, वेदना आणि बदला या तिन्ही गोष्टींचा सार सांगणारे दोन शब्द. ऑपरेशन सिंदूर…

पहलगाममध्ये जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांच्या रक्ताचा भारतीय लष्करानं घेतलेला सूड. ऑपरेशन सिंदूर.. भारतविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, याचा पाकिस्तानला मिळालेला आणखी एक धडा…

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातल्या नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणारं भारताचं हे महत्त्वाकांक्षी ऑपरेशन. या कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सुचवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.

कारवाईनंतर नावाच्या तपशिलाची गरज नाही

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट करून हल्ला केला होता. पहलगाममध्ये 26 महिलांचं कुंकू पुसल्याचा बदला बुधवारी पहाटे भारतीय लष्करानं घेतला. या कारवाईचं नाव ऑपरेशन सिंदूर असल्याचं जेव्हा मृतांच्या नातेवाईकांना समजलं, तेव्हा त्यांना इतर तपशीलांची गरजच उरली नाही.

पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्या संजय लेले यांचा मुलगा, हर्षद लेले यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य दिल आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा कोणत्या पुरुषाचं निधन होतं तेव्हा त्या पुरुषाची बायको कपाळावर कुंकू लावत नाही. जे लोक मृत पावले त्यांच्यासाठी हे सिम्बॉलिक नाव आहे. आमच्या कुटुंबाचे दुःख पूर्णपणे जाणार नाही. थोडं समाधान आहे की जे गेले त्यांचा बदला घेतला गेला.

देशवासियांच्या भावनांचा हुंकार

ऑपरेशन सिंदूर हे दोन शब्द 22 एप्रिल ते 7 मे या 15 दिवसांचा सगळा घटनाक्रम त्यातील भावनांसह सांगणारे ठरले. ‘ऑपरेशन’ शब्दात देशाची रणनिती होती. तर सिंदूर शब्दात देशवासियांच्या भावनांचे हुंकार होते.

अर्थात, या ऑपरेशनचं नाव जितकं समर्पक होतं, तितकीच हवाई दलानं केलेली कारवाईदेखील मोठी होती. त्यामुळं सर्वपक्षीयांनी या ऑपरेशननंतर लष्कराला मानाचा मुजरा केला.

नावात काय आहे, हा शेक्सपियरचा प्रश्न वर्षानुवर्षं विचारला जातो. पण नावात बरंच काही आहे, हे ऑपरेशन सिंदूरनं सिद्ध करून दाखवलंय. आज प्रत्येक भारतीय अभिमानानं फक्त एवढंच म्हणतोय.. ऑपरेशन सिंदूर… बस ‘नाम’ ही काफी है.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑपरेशन सिंदूर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 30, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा