mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चुन-चुन कर मारेंगे! कोणालाही सोडणार नाही, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार आक्रमक; म्हणाले दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आक्रमक झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना इशारा दिला आहे. भ्याड हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. चुन-चुन कर मारेंगे असा शब्दात अमित शाह यांनी हल्लाबोल केला.

दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर बोलताना अमित शाह दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावरुन आक्रमक झाले. दहशतवाद संपेपर्यंत आमचा लढा सुरुच राहील आणि ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना धडा शिकवणार असल्याचे अमित शाह म्हणाले.

कोणालाही सोडणार नाही : अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, आम्ही प्रत्येक गोष्टीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्याने मोठा विजय मिळवला आहे, तर समजून घ्यावे की हे नरेंद्र मोदी सरकार आहे.

आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा अमित शाह यांनी दिला आहे. या देशाच्या प्रत्येक इंचावरुन दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा संकल्प आहे आणि ते सिद्ध होईल असे अमित शाह म्हणाले.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे.

भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे.

भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हालचालींना वेग आला आहे. भारतीय नौदलाची जहाजे दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहशतवादी हल्ला

संबंधित बातम्या

Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
Next Post
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

खळबळ! बोगस डॉक्टरवर कारवाई; डॉक्टरने बीपी तपासून तुम्हाला इंजेक्शन देवू का? गोळ्या देऊ? विचारलं अन् काय घडलं...

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा