टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका सरपंचास मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजी तुकाराम सरगर यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून गुरुवारी दुपारी १२.०० वा.
जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान आलेल्या नंबरवरून महिला पोलिस हवालदार त्या अज्ञाताचा कसून शोध घेत आहेत. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी शिवाजी तुकाराम सरगर (वय ४५) हे चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच असून
दि.५ रोजी दुपारी १२.०० च्या दरम्यान फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक ९३७१८९४९७३ या फोनवरून अज्ञात व्यक्तीने काहीएक कारण नसताना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले असून याचा अधिक कसून तपास महिला पोलिस हवालदार सुनिता चवरे या करीत आहेत.
दरम्यान, या धमकीमुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली असून ही धमकी नेमकी कोणत्या कारणासाठी दिली याचा कसून तपास महिला पोलिस हवालदार करीत आहेत. सदरच्या धमकी आलेल्या नंबरचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याने लवकरच याचा पर्दाफाश केला जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज