mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सक्तीचा बडगा! सोलापूर जिल्ह्यात दुचाकीस्वार, सहप्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक; दुचाकीस्वारांच्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्यासाठी निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2024
in सोलापूर
सोलापूरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल सुमारे ४४ लाख रुपयाचा दंड वसूल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा नेहमीच राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक समितीने विशेषत: ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे.

बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जाणार आहे. आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यासह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट आहे, पण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी एक हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.

महामार्गांचे जाळे सर्वत्र विस्तारल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लेन कटिंग, ट्रिपलसीट दुचाकी, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, मद्यपान करून वाहन चालविणे, १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच वाहन चालविणे, अशा बाबींवर कारवाईवेळी अधिक फोकस केला जाणार आहे.

तत्पूर्वी, जिल्ह्यात सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणांना (ब्लॅकस्पॉट) आरटीओ, वाहतूक पोलिस, महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुसती पाहणी व तात्पुरत्या उपाययोजना न करता त्या अपघातप्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने ही पाहणी होणार आहे. रस्त्यालगत विशेषत: महामार्गालगत उभारलेली खोकी तथा हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणाजवळील हॉटेल, पेट्रोलपंपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी अपघात झालेल्यासंदर्भात पोलिसात दाखल फिर्यादींची पडताळणी करून अपघातात नेमकी चूक कोणाची, हे शोधले जाणार आहे. एकूणच अपघात रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खंबीर पाऊल उचलले आहे.

तिसऱ्यावेळी संपूर्ण दंड जागेवरच भरावा लागणार

पहिल्यांदा रस्त्यावर तथा महामार्गांवर वाहन चालविणाऱ्याने वाहतूक नियम मोडला आणि त्याला दंड झाल्यास सुरवातीला दंड भरण्याची घाई केली जाणार नाही. दुसऱ्यांनाही अशीच स्थिती राहील, पण तिसऱ्यांदा वाहतूक नियम मोडल्यास यापूर्वीचा सगळा दंड त्या वाहनचालकाला जागेवरच भरावा लागणार आहे.

दंड न भरल्यास त्याचे वाहन जप्त करण्याची करवाई केली जाणार आहे. नियम मोडून एखादे वाहन पुढे निघून गेल्यास त्याची माहिती जवळील टोल नाक्यांवरील महामार्ग पोलिसांना देवून त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होईल, असेही वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे.

अपघात रोखण्यासाठी आता ठोस कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे, महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी व ठोस उपाययोजना केल्या जातील.

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर गुन्हेही दाखल होतील. अपघात रोखण्यासाठी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचेही नियोजन आहे. बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हेल्मेटसक्ती

संबंधित बातम्या

नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
Next Post
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय? माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर

ताज्या बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा