टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम अंतर्गत सन २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रु.१३०.०५ लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता मिळाली आहे.
सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, सुट्टी फुले, मसाला पिके, फळबागा पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरीण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग, डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर,
मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच, ट्रॅक्टर २० एचपीपर्यंत, पॉवर टिलर 8 एचपीपेक्षा जास्त व कमी, पीक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पूर्व शीतकरणगृह, शीतखोली, शीतगृह, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर,
प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, स्थायी / फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह, द्राक्षपिकासाठी प्लास्टिक कव्हर इत्यादी घटकांचा समावेश आहे.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना अनुदानावर राबविण्यात येत आहेत. शिवाय शेतीपंपासाठी वीज मोफत करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक..
या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. शेतकरीकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज