टीम मंगळवेढा टाईम्स ।
बँक व्यवस्थापकांशी संगनमताने बेकायदेशीरपणे जागेचे गहाणखत करून बँकेकडून १ कोटी रुपयांचे कर्ज लाटले. यातील काही जागा परस्पर विकून आपल्या आईची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद आफदाब लतिफ कारीगर (वय ५२, रा. होटगी रोड, आसरा, सोलापूर) यांनी पोलिसात दिली आहे.
हा प्रकार १० जानेवारी २०१३ रोजी सह. दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला, तोहिद अय्युब शेख (वय ४०,रा.जोडभावी पेठ, सोलापूर), निलकंठ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक हरीश राधाकिशन सारडा (रा.सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील नमूद दोघांनी संगनमत करून मजरेवाडी, सोलापूर येथील नवीन सिटी सर्व्हे नं. १५०/१३/११/१/३, नवीन सिटी सर्व्हे नं. १५०/१३/१३/१/४ ही मिळकत एकूण ४ हजार चौरस मीटर
त्यामधील पश्चिमेकडील बाजूचे ०.३० आर म्हणजे ३ हजार चौरस मीटर क्षेत्राची जागा त्यापैकी ०.२५.३५ आर इतक्या क्षेत्राची जागा गहाणखत दस्त करून त्यावर १ कोटी रुपये नीलकंठ बँकेकडून कर्ज घेतले. फिर्यादीची आई रहिमा कारीगर व शासनाची फसवणूक केली.
तसेच या मिळकतीपैकी ४.६५ आर ही मिळकत तोहिद शेख याने आदिल गोलंदास यांना स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करून मिळालेली रक्कम वापरून सदरची जमीन हडप केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.
फसवणुकीपासून ग्राहकांनी सावध रहावे..
बँकेच्या नावाखाली आपल्या जागेची कागदपत्रे कोणाला देऊ नका. एखादा फोन आला तर त्यांना माहिती देणे टाळावे. थोडीफार शंका आली की आपल्या बँकेशी संपर्क साधावा. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज