टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या व्हाट्सएपच्या माध्यमातून apk फाईल पाठवून ते डाऊनलोड करायला लावून फसवणूकीचे प्रकार मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत चालले आहेत.
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लग्नपत्रिका एपीके फाइल्सच्या स्वरूपात पाठवत आहेत. ही फाइल डाऊनलोड करताच तुमच्या फोनमध्ये मालवेअर प्रवेश करतो; ज्यातून त्यांना तुमच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
सायबर फसवणुकीच्या रोज नवनवीन पद्धती समोर येत आहेत. कधी ओटीपीद्वारे, तर कधी व्हिडीओ कॉलद्वारे. आता हिमाचल प्रदेश पोलिसांनी ऑफसवणुकीच्या नव्या प्रकाराची माहिती दिली आहे.
व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका पाठवून सायबर – फसवणूक केली जात असल्याचे सांगण्यात आले. कार्ड डाऊनलोड करताच सायबर गुन्हेगारांना लोकांच्या मोबाईलची संपूर्ण माहिती मिळते. यानंतर मोबाईलही युजरच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो.
हिमाचल प्रदेश पोलिसांनी लोकांना अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर किंवा लग्नपत्रिकेवर क्लिक करू नये, असा सल्ला दिला आहे.
आयपीएस अधिकारी मोहित चावला यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपद्वारे एपीके फाइल्सच्या स्वरूपात लग्नपत्रिका पाठवत आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर सक्रिय झाल्यानंतर हॅकर्स फोनवरून संदेश पाठवू शकतात, वैयक्तिक डेटा चोरू शकतात आणि पैशांचा व्यवहारही करू शकतात.
हे सर्व होत असताना फोनधारकाला याची माहिती मिळणार नाही. सायबर फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असताना हिमाचल प्रदेश सायबर पोलिसांनी लोकांना सूचना जारी केली आहे;
ज्यात त्यांना अनोळखी नंबरवरून मेसेज आणि कॉल येत असताना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.
सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी कमी दरात कर्ज देण्याचेही आमिष दाखवतात. लोकांनी ऑनलाइन कमी दराच्या कर्जाच्या ऑफरला बळी पडू नये, कारण याद्वारे गुन्हेगार लोकांच्या फोनवरून माहिती काढतात.
कोणतीही apk फाईल डाऊनलोड करू नका
मी चुकून आमच्या ऑफिसच्या ग्रुपवर आलेली apk फाईल डाऊनलोड केली होती त्यानंतर रात्री लगेच माझ्या बँक खात्यामधील पैसे अचानक कट झाले.. मी रितसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.- नितीन पाटील, मंगळवेढा
काय करावे?
सायबर पोलिसांचे म्हणणे आहे की, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल उचलल्यानंतर तुम्ही तुमचे नाव आणि माहिती देऊ नये. असे कॉल डिस्कनेक्ट करावेत. नंबर ताबडतोब ब्लॉक करावा. कोणत्याही परिस्थितीत apk फाईल डाउनलोड करू नका, कॉल दरम्यान कोणताही नंबर डायल करू नका आणि कोणत्याही प्रकारच्या संभाषणात गुंतू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज