mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मिशन विधानसभा! पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी शरद पवारांकडून ‘या’ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 10, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवारी पुण्यात सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी, दादा गटाचे आमदार बबनराव शिंदे, पुतणे धनराज शिंदे यांच्यासह ६१ जणांनी मुलाखती दिल्या.

सोलापूर पवार गटाच्या पुण्यातील कार्यालयात मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,

पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा निरीक्षक शेखर माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील ११ १० पैकी मतदारसंघांत एकूण ६५ जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी ६१ जणांनी मुलाखती दिल्याचे माने यांनी सांगितले.

पंढरपुरातून भालके, सावंत, देशमुखांसह १२ जण

पंढरपुरातून भगिरथ भालके, प्रथमेश पाटील, राहुल शहा, अनिल सावंत, सुभाष भोसले, डॉ.संजय भोसले, वसंतराव देशमुख यांच्यासह १२ जणांनी मुलाखत दिली. सांगोल्यातून जयमाला गायकवाड, बाबूराव गायकवाड यांनी मुलाखत दिली.

काँग्रेसच्या साठेंनी केला दावा महाआघाडीत करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील, संतोष वारे, रामदास झोळ, माळ्यातून संजय कोकाटे, काँग्रेसच्या मिनल साठे, शिवाजी कांबळे, संजय घाटणेकर, अनिल सावंत, बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकसभेला भाजपसोबत गेलेले अभिजित पाटील यांनीही मुलाखत दिली.

अन् चर्चेला सुरुवात

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आजवरच्या जागा वाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला, लोकसभेला धर्मराज काडादी हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सहभागी होते. खासदार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना सोबत घेतले होते.

दरम्यान, सोलापूर दक्षिणसाठी खासदार प्रणिती शिंदे आग्रही आहेत. दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी पवार गटाकडून या मतदारसंघासाठी मुलाखत दिली. त्यामुळे नव्या चर्चाना तोंड फुटले. काडादी यांच्यानंतर दक्षिणमधून मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार यांनीही मुलाखत दिली.

उत्तम जानकर अनुपस्थित

माळशिरसमधून राजू साळवे, रणजित सरवदे, विकास धाईजे, धनंजय साठे, त्रिभुवन धाईजे, राजेश गुजर, चंद्रशेखर खडतरे यांनी मुलाखत दिली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उत्तम जानकर हेच आमचे उमेदवार असतील, असे म्हटले होते. परंतु, जानकर मुलाखतीला अनुपस्थित होते. जानकर लवकरच पक्ष प्रमुखांची भेट घेतील, असे निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.

ढोबळेंच्या मुलांचा दोन मतदारसंघांवर दावा

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित आणि कन्या कोमल डोबळे-साळुंखे यांनी मोहोळ, माळशिरस मतदारसंघातून मुलाखत दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा करणारे रॉकी बंगाळे, मुंबईतील सेना नेते राजू खरे यांनीही मोहोळसाठी मुलाखत दिली. याशिवाय माजी आमदार रमेश कदम, संजय क्षीरसागर, माजी महापौर सुशीला आबुटे यांच्यासह १६ जणांनी मोहोळसाठी मुलाखत दिली.

धर्मराज काडादी काय म्हणाले?

“महाआघाडीत सोलापूर दक्षिणची जागा कोणत्या पक्षाकडे जाईल माहिती नाही. मी राजकारणात पडणार नव्हतो. पण शरद पवार यांनीच मला यंदा निवडणूक लढवावी लागेल, असा निरोप दिला. त्यांच्या निर्देशानुसारच मी उमेदवारीसाठी मुलाखत दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुलाखतशरद पवार

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
Next Post
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख; निवडणुकांचा बिगुल 'या' आठवड्यात वाजण्याची शक्यता?

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा