टीम मंगळवेढा टाईम्स ।
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत आधार दिला.
तुळजापूर येथे देवीची ज्योत आणायला गेल्यानंतर गोणेवाडी येथील भाविकांचा अपघात गत आठवड्यात झाला होता. यामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
या घटनेने गोणेवाडी गावावरच नाहीतर संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली होती. प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे या दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला होता.
अनिल सावंत यांनी मृत पावलेल्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत त्यांना आधार दिला तसेच आर्थिक मदतही केली.
अनिल सावंत हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून अनेकांच्या दुःखात सहभागी होताना आजपर्यंत दिसले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी आर्थिक मदतही केली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज