mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार व्हायचंय! मनोज जरांगे यांच्याकडे 800 उमेदवारांचे अर्ज; सर्वाधिक अर्ज कोणत्या भागातून? ‘या’ तारखेला असणार चर्चासत्रं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2024
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे.

त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत.

मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा आज जाहीर केला आहे. या आकड्यावरून मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिलीय. आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल.

पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. तर मराठवाडा, विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत.

अर्ज येतच आहेत. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे ठरवायचे आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

29 तारखेला चर्चासत्रं

येत्या 29 तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे.

या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेला अंतरवलीत एक छोटेखानी चर्चा सत्र ठेवू. कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

ही राजकीय बैठक नाही

मराठा समाजाच्या कानावर काहीही आलं तरी लाखोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवलीला येतो. माझ्या समाजाच्या चरणी मी नतमस्तक होतो. एका हाकेवर हा समाज येतो. त्यामुळेच मला लढायचं बळ मिळतं. येत्या 29 तारखेला ज्यांना शक्य आहे, त्यांनी अंतरवलीत यावं. फक्त कामे बुडवून येऊ नका.

थोड्या संख्येनेच या. मी काही जाहीर आवाहन करत नाही. कारण छोटा कार्यक्रम घेत आहोत. शेतीची कामे खोळंबू नये म्हणून कार्यक्रम छोटाच करणार आहोत. ही कोणतीही राजकीय बैठक नाही, फक्त एक वर्ष पूर्ण झाले म्हणून छोटेखानी चर्चासत्र आपण घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही ठेका घेतला नाही

मी जातीवाद करत नाही. मी कोणत्या गोरगरीब ओबीसीला, धनगर बांधवांना, मुस्लिम बांधवांना, बारा बलुतेदारांना दुखावलं नाही. फक्त नेत्याला सोडत नाही. आमच्या आणि त्यांच्या सुद्धा नेत्यांना सोडत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा का घ्यायचा नाही? कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात हे आम्हाला माहीत आहेत. 30 सप्टेंबरच्या आत सगळी कर्जमाफी केली पाहिजे.

राज्यात अनुदानही मिळाले पाहिजे. पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे. एखाद्या मुद्द्यावर ठाम झालो तर मी कोणाच्या बापाला भीत नाही. माझा शेतकरी बाप जगला पाहिजे, आम्ही तुमचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

फुकट देत नाही

माझा मराठा समाज एकटाच 50-55% आहे. तुम्ही आमचे काम करा. तुम्ही सगळे प्रश्न काढून ठेवले आहेत. कामगारांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, वकिलांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शहीद कुटुंबाचे सगळे प्रश्न अडकून ठेवलेले आहेत. सत्ता चालवत आहेत आणि गोरगरिबांचे रक्त पीत आहेत. फक्त थोडी चिरीमिरी देतात, आमच्या आयुष्याची सुविधा थोडीच देता. थोडेच देता आणि काढतात खूप. देताना तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही, आमच्या टॅक्समधून पैसे काढूनच देता, असंही ते म्हणाले.

त्यांना उलटं टांगून हाणा

तुम्ही लोकांच्या आयुष्यांचे वाटोळे करायला निघाले आहात का? तुम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचे कर्ज देऊ नका, आमच्या फक्त दोन-तीन गोष्टी द्या. आमच्या लोकांना कायमचं पाणी उपलब्ध करून द्या, लाईट द्या आणि आमच्या मालाला भाव द्या, तुमचे कर्ज, अनुदान तिकडेच ठेवा.

सरकार कारण सुद्धा असं देतं की पीक विम्याचा प्रश्न हा कंपनीचा आहे. परंतु राज्य तुम्ही चालवताना ना? राज्य तुम्ही चालवता. तुमचं कंपन्यावरती नियंत्रण पाहिजे. कंपन्या ऐकत नसतील तर त्यांना उलटे टांगून हाणा. आमचे पैसे घ्यायला गोड लागतात कंपन्यांना आणि देताना त्यांना काय होतं? असा सवाल त्यांनी केला.(स्रोत:TV9 Marathi)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Next Post
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा