टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे.
बारावीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व शहरातून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून ५३ हजार ७४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते़ त्यापैकी ५० हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात अ श्रेणीतून २३ हजार ९०४, ब श्रेणीतून १९ हजार ४०४ विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे.
तालुकानिहाय निकाल
- मंगळवेढा : 97.30%
- मोहोळ : 95.62%
- माळशिरस : 92.40%
- पंढरपूर : 95.36%
- उत्तर सोलापूर : 92.92%
- सांगोला : 95.70%
- अक्कलकोट : 90.70%
- बार्शी : 93.81%
- करमाळा : 89.62%
- माढा : 95.09%
मंगळवेढा तालुक्याची बाजी
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या तालुक्याचा निकाल 97.30 टक्के इतका लागला आहे. या तालुक्यातून एक हजार 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी एक हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज