टीम मंगळवेढा टाईम्स ।
काँग्रेस हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल, मी काँग्रेसची म्हणून जन्माला आले आणि मरेन पण काँग्रेसची म्हणूनच, अशा शब्दात फेसबुक पेजवर पोस्ट टाकत शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम दिला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा ऐकण्यास मिळते. तशी ऑफर आलेली आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या विषयावर पडदा टाकला.
एकीकडे भाजपकडून उमेदवाराची चाचपणी सुरु असताना आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रवेशाची चर्चाही सुरू होती. मुंबईमध्ये भाजपच्या सोलापुरातील काही स्थानिक मोठ्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन भाजपची ऑफर दिल्याचेही खात्रीशीर चर्चा रंगत होत्या.
लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आ. प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याअनुषंगाने देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्ह्यात तयारीही सुरू केलेली आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आमदार शिंदे यांनी फेसबुक पेजद्वारे हा खुलासा दिलेला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज