टीम मंगळवेढा टाईम्स ।
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज रविवार, ३१ डिसेंबर रोजी मंगळवेढा, पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ७ वाजता संभाजी नगर येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
आज रविवारी दिवसभर सोलापूर शहर व ग्रामीण परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सायंकाळी साडे सहा दरम्यान ते शासकीय वाहनाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.
आज सकाळी ९.३० दरम्यान पालकमंत्री पंढरपूर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री हरिहर शिव महापुराण कथा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
त्यानंतर, ११.३० वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १ दरम्यान जिल्हा नियोजन समिती निधीतून कासेगाव येथे केलेल्या वनविभागाच्या विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात डीपीसी निधीतून केलेल्या विविध कामांची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील मौजे दामाजी नगर येथील विविध कामांची पाहणी करणार आहेत. पावणे पाच दरम्यान पालकमंत्री सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
साडे पाच दरम्यान विजापूर रोड येथील आयोजित लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर साडे सहा दरम्यान कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.(स्त्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज