mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर! ‘एवढे’ हजार पदे भरली जाणार, नवीन आकृतिबंध तयार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2023
in मनोरंजन, राज्य
उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी हजेरी अनिवार्य; गैरहजरांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. ही भरती नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे होणार आहे. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

नवीन आकृतीबंधामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्यानुसार ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता. जून महिन्यात राज्याचा आकृतीबंद करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे, त्याची माहिती मिळाली, असे सतेज पाटील यांनी म्हटले.

त्यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहे. यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार आहे. यासाठी गृहमंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

वयोमर्यादा वाढ होणार?

दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी असले पाहिजे, असा सर्व आकृतीबंध झाला आहे. प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. मागील दोन वर्षांत कोव्हीडमुळे भरती झाली नव्हती. त्यानंतर ही भरती सुरु झाली आहे. त्याकाळात देण्यात आलेली वयोमर्यादाची वाढीची मुदत आता संपणार आहे.

ती संपण्याच्या आत नवीन भरती करता येईल का? हा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आधी जाहिरात काढून हवे तर नंतर भरती करता येईल का? हा निर्णय गृहविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायबर सुरक्षेसाठी एक हजार जणांना प्रशिक्षण

राज्यात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पोलीस दलात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तसेच आतपर्यंत एक वेळी आठ हजार ४०० युवकांना प्रशिक्षण देता येत होते. त्यामुळे भरतीसाठी मर्यादा होत्या. त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. ही क्षमता वाढवण्यात येत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुंबई पोलीस भरती 2023

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

May 4, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

किळसवाणी! भोर प्रकरणातल्या विकृत नराधमाचं हादरवणारं सत्य; वाचून येईल संताप

May 4, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
Next Post
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी "टेल टू हेड" मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा