मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत.
शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. कराडमधील प्रीतीसंगमावर जात पवारांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. तिथून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
प्रीती संगमावरून शरद पवार यांनी हात उंचावत उपस्थितांना अभिवादन केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.
शरद पवार जेव्हा प्रीती संगमावर बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो…, शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. येत्या काळात जनता त्यांना उत्तर देईल, असं शरद पवार म्हणालेत. सामान्य माणसांचा लोकशाही अधिकार जतन केला गेला पाहिजे, असंही ते म्हणालेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज