mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलेच्या मोहापायी देशद्रोह! डीआरडीओचा संचालक हनीट्रॅपमध्ये अडकला; पुण्यात एटीएसकडून अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पुण्याच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) संचालक तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादविरोधी प्रतिबंधक पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

पाकची गुप्तचर संघटना आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी संरक्षण माहिती पाकिस्तानास पुरवल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे कुरुलकर यांच्या निवृत्तीला सहा महिनेच शिल्लक असताना हनीट्रॅपसारख्या प्रकारात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

प्रदीप कुरुलकर विभागाची संवेदनशील पुण्यातील डीआरडीओ कार्यालयात बुधवार, ३ मे रोजी ड्यूटीवर असताना कुरुलकर यांनी पाकिस्तानी आयएसआयच्या हस्तकाशी

व्हॉट्सअॅप व्हॉइस मेसेज आणि व्हिडिओ कॉलवर संपर्क साधून त्याला संरक्षण दलाची अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती पाठवली.

कुरुलकरविरोधात मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या मोहापायी देशद्रोह

कुरुलकर हे फेसबुक व व्हॉट्सअॅप मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात आले. प्रत्यक्षात महिलेचे छायाचित्र असलेले ते बनावट फेसबुक खाते होते. ते एक आयएसआय हस्तक चालवत होता. महिलेच्या नादाने कुरुलकर चॅटमध्ये गोपनीय माहिती पुरवत होते. डीआरडीओच्या कार्यालयात बसूनही हे उपद्व्याप सुरू होते.

कलाम यांच्यासोबत केले काम

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे, रोबोटिक्स व लष्करात उपयोगी ठरणाऱ्या मानवरहित मोबाइल तंत्रज्ञान, उपकरणांचे डिझाइन तसेच विकासात कुरुलकर यांचे प्रावीण्य होते. त्यांनी ६ वर्षे दिवंगत शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध प्रकल्पांत काम केले होते.

सन १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने पोखरण येथे केलेल्या अणुस्फोट चाचण्यांसाठी निवडलेल्या ३५ शास्त्रज्ञांमध्ये त्यांचाही समावेश होता. मात्र निवृत्तीला ६ महिने बाकी असताना हनीट्रॅपमध्ये अडकल्याने त्यांच्या कारकीर्दीला बट्टा लागला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरोपी अटक

संबंधित बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

June 9, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
राज्यात साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे : कृषिमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! मुख्यमंत्र्यांचे आवाहन, ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

June 8, 2026
मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

मंगळवेढ्याची लेक चीनमध्ये फडकवणार तिरंगा! पण… गरिबी आड येतेय; ‘प्रज्ञा’च्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पुढे या; दानशूर व्यक्तींना मदतीचे नम्र आवाहन

June 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
Next Post
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आजचा मंगळवेढा दौरा दुष्काळी तालुक्याला दिशा देणारा ठरणार; दुपारी 3 वाजता इंग्लिश स्कूलमध्ये कृषी उद्योजकता मेळावा

अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर; पवारांनी माघार घ्यावी यासाठी रडणारेच भाजपच्या दारात उभे होते; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 10, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 10, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा