mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 11 वर, मृतांची यादी जाहीर; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; पाच लाखाचे अर्थसहाय्य जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 17, 2023
in राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे.

तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मंगळवेढा येथून गेलेल्या एका महिलेचा यात मृत्यू झाला आहे. ही महिला घरनिकी येथील असल्याचे बोलले जात आहे. त्या मंगळवेढा शहरात व मुंबईत राहत असल्याची माहिती मिळत आहे.

कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

उष्माघाताचा तडाखा बसलेल्यांवर नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 जणांना उपचार करून डिशचार्ज देण्यात आला आहे.

कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत सुद्धा जाहीर केली आहे. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप होत आहे.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाची वेळ ही स्वत: धर्माधिकारी यांनी दिली होती असे सांगून आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्या 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातील रात्री उशिरा पर्यंत 10 जणांची ओळख पटली आहे. एका महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिची ओळख पाठविण्याचे काम प्रशासन करीत आहे.

हे सर्व मृतदेह पनवेलच्या नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून, काही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. काही मृतदेह रुग्णालयातच आहेत.

कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती मृतदेह?

एमजीएम हॉस्पिटलमध्ये 01, भारती मेडिकल हॉस्पिटलमध्ये 02, टाटा हॉस्पिटलमध्ये 08 असे एकूण 11

मृतांची नावे

1.तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार, 2. जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा, 3. महेश नारायण गायकर वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा, 4. मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई, 5. भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे

6. सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर, 7. स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार, 8. पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे, 9. वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर, 0. कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर असे 11 अनोळखी आहे

पाच लाखाचे अर्थसहाय्य जाहीर

या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आज खारघर येथे आयोजित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सदस्यांना रुग्णालयात हलवावे लागले,

दुर्दैवाने त्यातील 11 जणांचे उपचार सुरू असताना निधन झाले. ही अतिशय अनपेक्षितपणे घडलेली दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे.

या घटनेची माहिती कळताच मी स्वतः कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने धाव घेतली. डॉक्टरांशी तसेच उपचार सुरू असणाऱ्या श्री सदस्यांशी बोललो आहे.

या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या श्री सदस्यांच्या परिवारास प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येतील आणि उपचार घेत असणाऱ्या श्री सदस्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनातर्फे केला जाईल असे निर्देश प्रशासनाला आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात दाखल काही श्री सदस्यांच्या उपचारांवर मी स्वतः लक्ष ठेवून असून प्रशासन आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. उपचार घेणाऱ्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आप्पासाहेब धर्माधिकारी

संबंधित बातम्या

लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 12, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
Next Post

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नटराज पॅनलचा विजय; मंगळवेढ्याच्या तेजस्विनी कदम मोठ्या मताधिक्याने विजयी

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा