mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; पक्ष तिकीट देणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, शैक्षणिक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; पक्ष तिकीट देणार?

 



टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात येत्या काही दिवसात राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड होणार असून त्यासाठी अनेक प्रतिष्ठित मंडळींनी पक्षाच्या प्रमुखाशी भेटीगाठी सुरू केल्या असून अकलूज मधील राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यातून धवलसिंह मोहिते पाटील हे इच्छुक आहेत.


आपण कृषी, आरोग्य, शिक्षण, रक्तदान, रोजगार निर्मिती, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकिय क्षेत्रात सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहोत आणि त्यामागे वडील माजी खासदार कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची प्रेरणा आहे. माझे दापोली येथील कृषी विद्यापीठात एम.एस्सी. अॅग्री (पी.एच.डी जेनेटिक्स अँड प्लॅन्ट ब्रीडिंग ) इथपर्यंत शिक्षण झाले आहे.

देशाची अर्थव्यवस्था शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना मला आर्थिक न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आपण राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यातून इच्छुक आहोत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आपला प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी सदस्य धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.


मोहिते-पाटील पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा आपण प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आदेश आम्ही शिरसावंद्य मानून काम केले. त्यामुळे पक्षाने आता माझ्यासारख्या उच्चविद्याविभूषित आणि कर्तबगार उमेदवारास संधी देणे गरजेचे आहे. 

कृषी विद्यार्थी जीवनात आपण चार वेळा जनरल सेक्रेटरी, जनसेवा विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रेसलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष, ऑनररी श्री प्रतापसिंह मोहिते पाटील ट्रस्ट तसेच धवलसिंह मोहिते पाटील युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष म्हणून लक्षवेधी काम केले आहे.

दरवर्षी किमान ८० हजार ते १ लाख शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी युवकांसाठी कबड्डी स्पर्धा घेऊन त्यांचे सबलीकरण केले जाते. दुष्काळप्रवण क्षेत्रात आतापर्यंत कोल्हापूर पद्धतीचे २२ बंधारे बांधले आहेत. 

शंकरराव मोहिते पाटील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, को-ऑपरेटिव्ह बँक, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सहकार महर्षी मोहिते पाटील ट्रस्ट, स्वामी सर्वादानंद रोग निदान केंद्राचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक म्हणून आपण आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे, अनेकांना सहकार्य केले आहे.


कोरोना संचारबंदी आणि अनलॉकमध्ये हातावर पोट असणाऱ्या हजारो कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक ,आंध्रप्रदेश येथे चालत चाललेल्या हजारो कामगारांना टेंभुर्णी येथे निवारा आणि जेवण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून आपण पक्षसंघटन मजबूत करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. 

पक्षाचे युवकांना पाठबळ देण्याचे धोरण असल्याने आपले योगदान लक्षात घेऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मला जनसेवेची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Mohite-Patil aspires for Legislative Council; The NCP will give the ticket

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026
Next Post
मंगळवेढ्यात कोरोनाचा धोका वाढतोय! आज पुन्हा 14 जणांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात कोरोनाचा धोका वाढतोय! आज पुन्हा 14 जणांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा