टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतोना दिसत आहे. आज पुन्हा 14 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण बाधितांची संख्या 220 वर गेली आहे.
आज सोमवार दि.10 ऑगस्ट रोजी 57 जणांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी तपासणीकामी घेण्यात आलेले आहेत. आज 124 जणांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 124 रॅपीड अॅन्टीजन टेस्टपैकी 13 पॉझिटिव्ह आले आहेत तर 111 निगेटिव्ह अहवाल आलेले आहेत.
सदर नागरिक आंधळगांव 3 , अरळी 3 , मंगळवेढा शहर 7 येथील निकटतम संपर्कातील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेल्या स्वब ( RT – PCR ) चे 1 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर नागरिक मंगळवेढा शहर येथील असून सध्या अकलूज येथे उपचार घेत आहे.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 220
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 106 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज