टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील भैरवनाथ बहुउद्देशीय संस्था भोसे संचालित नवसाई इंग्लिश मिडीयम स्कूल धर्मगाव व डॉ. एम. आर. टकले प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास बिल्डिंग मटेरिअल कॉन्ट्रॅक्टर, पंढरपूर येथील सलीम हुसेन बोहरी यांच्या अध्यक्षेखाली तसेच भुलतज्ञ पंढरपूर येथील डॉ.राजेंद्र जाधव या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री एम. आर. टकले व उपाध्यक्ष श्री ईश्वर भाऊ गडदे यासोबत श्री. उत्तम भाऊ टकले, श्री. दादा टकले, मुख्याध्यापिका श्रीमती लता रायबान व श्रीमती राणी दोलतोडे
तसेच मुख्याध्यापक इंगवले सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने बक्षीस पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. जाधव यांनी मुलांचे अभिनंदन करून प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सलीम बोहरी सर यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेऊन मुलांचे कौतुक केले. तसेच डॉ. जाधव शाळेस श्यामची आई’ या पुस्तकाचा संच भेट दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्योती भोसले मॅडम व श्रीमती रेखा सोमगोडे मॅडम यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती लता रायबान यांनी केले. आभार समन्वयक श्रीमती सोनाली माळी मॅडम यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज