टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर परिसरातील एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दुचाकीने पाठलाग करून ‘तू मला आवडतेस ‘ म्हणत चिठ्ठी देऊन तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी सचिन संगमेश्वर मस्के (रा. डोंगरगाव) याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगी ही २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाळेला जात असताना आरोपी सचिन मस्के याने त्याचे मोटारसायकलवरून पाठलाग केला.
तसेच सायंकाळी ४.१५ वाजता शाळा सुटल्यानंतरही पीडिता सायकलवर जात असताना आरोपीने पुन्हा पाठलाग सुरू केला.
‘ही चिठ्ठी घे. तू मला खूप आवडतेस’ म्हणत तिचा विनयभंग केल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल बामणे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज