mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 18, 2023
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
भगीरथ भालकेंनी ‘ती’ घोषणा करताच राष्ट्रवादीसह भालके गटाला लागली घरघर; नानांचे कट्टर समर्थक आ.आवताडे गटात

टीम मंगळवेढा टाईम्स। 

स्वर्गीय भारत नाना भालके यांनी सलग तीन वेळा मंगळवेढा-पंढरपूरचे प्रतिनिधित्व केले. 22 वर्ष त्यांनी विठ्ठल परिवार एक संघ ठेवला. मात्र त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराला घरघर लागली आहे.

यामध्येच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ दादा भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परिचारकांसोबत लढण्याचे जाहीर केले.

त्या वक्तव्याचे पडसाद आता पंढरपुरच्या राजकारणात उमटण्यात सुरुवात झाली आहे.

वर्गीय नानांचे कट्टर समर्थक विजयसिंह देशमुख आमदार आवताडे यांच्या सोबत

वर्गीय भारत नाना भालके यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. भगीरथ भालके यांच्या त्या वक्तव्यावरून विठ्ठल परिवार अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

स्वर्गीय भारत नाना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र भगीरथ दादा यांचा निसटता पराभव झाला. भाजपने परिचारक-आवताडे गटांना एकत्र आणत विजयश्री खेचून आणली.

…परिचारक आणि आवताडे यांच्यातील वाद वाढत गेला

मंगळवेढ्याच्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक आणि भालके गट एकत्र येत समविचारी आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या सह त्यांच्या पॅनलचा धुवा उडाला. त्यानंतर मात्र परिचारक आणि आवताडे यांच्यातील वाद वाढत गेला.

दामाजीच्या विजयामुळे समविचारी आघाडीचे मनोबल वाढले

दामाजी कारखान्यात मिळालेल्या विजयामुळे समविचारी आघाडीचे मनोबल वाढले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळवेढ्यातील एका कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारक आणि युवक नेते भगीरथ भालके एकत्र आले होते.

परिचारक-भालके एकत्र आल्याने काहींच्या पोटात पोटशुळ उठला

मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी आघाडी एकत्र लढणार असल्याचे भालके यांनी जाहीर केले. तसेच परिचारक-भालके एकत्र आल्याने काहींच्या पोटात पोटशुळ उठला आहे असे विधान त्यांनी केले. त्यानंतर मात्र पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकच खळबळ उडाली.

पोटनिवडणुकीत पराभव, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्याने भगीरथ भालके हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.

राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवार सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भालके हे जास्त सक्रिय झालेले दिसले नाहीत. त्या उलट विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने विठ्ठल परिवाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे भगीरथ भालके यांनी आपला मोर्चा मंगळवेढ्याकडे वळवला.

हीच आघाडी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय भालके यांनी जाहीर केला आणि याच निर्णयाने घात झाला

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून परिचारक-भालके गट एकत्र आला आणि त्यांनी सत्ता काबीज केली. हीच आघाडी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय भालके यांनी जाहीर केला. आणि याच निर्णयाने घात झाला.

विठ्ठल परिवार हाच परिचारकांना तोड देऊ शकतो हे या मतदारसंघाचे राजकीय समीकरण आहे. मात्र परिवाराच्या नेत्यानेच परिचारकांबरोबर आघाडी केल्याने विठ्ठल परिवारामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भालके समर्थक, परिचारक विरोधकांनी नवा पर्याय शोधण्याचे काम सुरू केले

आजी-माजी नगरसेवकांसह,राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भालके समर्थक, परिचारक विरोधकांनी नवा पर्याय शोधण्याचे काम सुरू केले. संजय बंदपट्टे यासारख्या नेत्यांनी तर थेट शिंदे गटात प्रवेश केला.

तर काही पदाधिकारी आमदार समाधान आवताडे आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संपर्कात गेले. आवताडे-परिचारकांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे.

दामाजीची सत्ता हिरावून घेतल्याने आवताडे देखील परिचारकांवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता पंढरपूर तालुक्यात स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भालके गट विठ्ठल परिवारातील अनेक नेते त्यांनी आपलेसे केले आहेत.

तर विठ्ठलच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात परिचारकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने अभिजीत आबा पाटील देखील विठ्ठल परिवाराचे लाडके झाले. त्यामुळे त्यांच्याकडे देखील गटाचा कल वाढला आहे.

परिचारक-भालके विरुद्ध पाटील- अवताडे गट एकत्र येण्याची शक्यता

भविष्यात परिचारक-भालके विरुद्ध पाटील- अवताडे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.

एकंदरीतच भगीरथ भालके यांच्या एका  वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवाराला अखेरची घरघर लागल्याचे बोलले जात आहे.

डॅमेज कंट्रोल भगीरथ भालके कसे हाताळतात

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि कट्टर भालके समर्थक विजयसिंह देशमुख यांनी त्याची प्रचिती दाखवून दिली आहे. आता हे डॅमेज कंट्रोल भगीरथ भालके कसे हाताळतात यावर त्यांची राजकीय मुत्सद्यगिरी स्पष्ट होणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.भारत भालके

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
Next Post

मंगळवेढ्यात भाविकांची ट्रॅव्हल्स पलटी; एक जण जागीच मयत; 35 भाविक जण जखमी

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..