mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुशखबर! पोलीस भरती उमेदवारांना आता गोळाफेकीच्या सलग ‘इतक्या’ संधी; मैदानी चाचणी २ जानेवारीपासून; अशी असेल गुणदान पद्धत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 2, 2023
in सोलापूर
सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीसाठी आजपासून अर्ज करता येणार; वयोमर्यादा, शुल्क, पात्र होण्यासाठी गुण सर्व माहिती घ्या जाणून…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता आजपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील.

महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत.

पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.

गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत.

तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे.

यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे,

पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.

लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल.

चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे.

वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.(स्रोत:सकाळ)

अशी असेल गुणदान पद्धत

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :

६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.

१०० मीटर धावणे (पुरुष) :

११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.

१०० मीटर धावणे (महिला) :

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

८०० मीटर धावणे (महिला) :

२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.

१६०० मीटर धावणे (पुरुष) :

५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलिस भरती

संबंधित बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
Next Post
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

आम्ही लग्नाळू! लग्नाच्या प्रतीक्षेत असलेले नवरदेव मंडवळ्या बांधून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा