टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दुपारी आलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री १२ पर्यंत २० ९९ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी १ ९ ८६ अहवाल निगेटिव्ह आले असून ११३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ५७ पुरुष तर ५६ महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.सोमवारी ५० बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. 113 crore patients found in Solapur; The number of patients reached 6064
ज्या वेगाने सोलापूर शहर आणि परिसर बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे . त्याच प्रमाणे मृत्यूचे कमी होताना दिसत आहे . सोमवारी मात्र नवीन ११३ रुग्ण आढळले आहेत .मोठ्या प्रमाणावर शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यानुसार टेस्टिंग होत आहे परंतु , अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.जेणेकरून , कोरोनाची साखळी तोडण्यात सोलापूरकर यशस्वी होतील . सोमवारी १ कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ६०६४ इतकी झाली आहे , तर आतापर्यंत एकूण ३ ९ ३ जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११०२ इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या ४५६ ९ इतकी लक्षणीय आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज