mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण; राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खासगी सावकारीतून तरुणाला केली मारहाण; राष्ट्रवादीच्या नगसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनपा सभागृह नेते असलेल्या किसन जाधव यांच्यावर खासगी सावकारकी आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलगर वस्ती जवळील अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ खाजगी सावकारीतून एका तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.


प्रवीण जाधव याने 6 महिन्यांपूर्वी आईच्या कपडे व्यवसायासाठी खासगी नगरसेवक किसन जाधव याच्याकडून 50 हजार रुपये प्रति महिना 10 टक्के व्याजाने घेतले होते. परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे साडी विक्रीचा व्यवसाय झाला नाही.

त्यानंतर प्रवीण जाधव याला किसन जाधव याचे पैसे देता आले नाहीत. 16 ऑगस्ट रोजी प्रवीण जाधव हा त्याच्या मावशीला उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याने मावशीला पाहण्यासाठी गेला होता.


त्यावेळी किसन जाधव याच्या पत्नीलासुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. त्यामुळे किसन जाधवसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी किसन जाधव याने प्रवीण जाधव याला 50 हजार व त्याचे व्याज असे 2 लाख रुपये कधी देणार, असे विचारले. तेव्हा प्रवीण याने किसन जाधव याला सध्या साडी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने माझ्याकडे पैसे नाहीत, मी थोड्या दिवसात पैसे अ‍ॅडजेस्ट करून देतो,

असे सांगितले. तेव्हा किसन जाधव याने मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे का? तुला मी दाखवितो, असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रवीण जाधव व त्याचा मित्र असे दोघे गप्पा मारत अण्णासाहेब पाटील शाळेजवळील राठोड किराणा दुकानाशेजारी रिक्षात बसले होते. 


तेव्हा किसन जाधव याचे 6 महिन्यांपूर्वी व्याजाने घेतलेले पैसे परत न दिल्याने किसन जाधव याच्या सांगण्यावरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगूू गायकवाड यांनी प्रवीण जाधव याला लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, बेसबॉल बॅटने मारून खुनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, किसन जाधव, शुभम मरगू जाधव (सर्व रा. सोलापूर) अशा 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भुसनूर हे करत आहेत.

A case has been registered against five persons, including Solapur NCP corporator Kisan Jadhav

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी आज मंगळवेढयात येणार

सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी आज मंगळवेढयात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा