टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील निमा संघटनेची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत अध्यक्ष म्हणून डॉ.अतुल निकम तर उपाध्यक्षपदी डॉ.गिरीश मासाळ व सचिवपदी डॉ.सुभाष देशमुख यांची निवड करण्यात आली.
मंगळवेढा येथे नुकतीच निमा संघटनेची तालुकास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत विविध आरोग्य विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
दरम्यान या बैठकीतच सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ.अतुल निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
क्रीडा विभाग डॉ.विजय धायगोंडे , सांस्कृतिक विभाग डॉ.समाधान टकले, प्रसिध्दीप्रमुख डॉ.भिमराव पडवळे, खजिनदारपदी डॉ.महेश माळी यांच्याही निवडी यावेळी करण्यात आल्या.
सार्वजनिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे नियोजन ठरले. या कार्यक्रमाला निमा संघटनेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज