टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा येथील दामाजी कारखाना रोड, कृष्णनगर (बायपास लगत) येथे आज शुक्रवार, दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

उद्योजक पोपट भाऊसाहेब रणे आणि समस्त रणे परिवार (कृष्णा बोअरवेल्स) यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

आज दुपारी ४:०० ते ६:००: ह.भ.प. हनुमान भजनी मंडळ, सोहाळे यांचा भजनाचा कार्यक्रम
सायंकाळी ६:०० ते ७:३०: श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर यांच्या वतीने हरिपाठ (संगीत विशारद: ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव)
सायंकाळी ७:३० ते ९:३०: झी टॉकीज फेम भारू़डरत्न ह.भ.प. कृष्णा महाराज जोगदंड (कामखेडा, लातूर) यांचे समाजप्रबोधनपर भारूड

रात्री ९:३० ते १२:००: ह.भ.प. विलास गजगे महाराज यांचे कीर्तन व श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
या सोहळ्यादरम्यान दुपारी २:०० वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसाद व उपवासाच्या भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, अवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, श्रीक्षेत्र दामाजी अन्नछत्राचे चेअरमन विष्णुपंत आवताडे, डी.सी.सी. बँकेचे संचालक बबनराव आवताडे, प्रांताधिकारी बी. आर. माळी, डीवायएसपी बसवराज शिवपूजे, तहसीलदार मदन जाधव,
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिद्दे, उद्योजक सिध्देश्वर रणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार दिगंबर भगरे, शिवाजी पुजारी, समाधान फुगारे, प्रमोद बिनवडे उपस्थित राहणार आहेत.
भाविकांनी या जन्मोत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणभक्ती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पोपट भाऊसाहेब रणे व समस्त रणे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













