mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

…तर आमदार अवताडे यांचा झंझावात कोणीही रोखू शकणार नाही; जाणकारांनी व्यक्त केले मत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 24, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! समाधान आवताडेंच्या घराबाहेर समर्थकांचा विजयी जल्लोष; भाजपाने उधळळा गुलला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेला दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली.

निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना स्वकीयांनीच पराभवाची चव चाखायला लावली त्यामुळे आगामी काळात आमदार समाधान आवताडे यांना दामाजी कारखान्यातील पराभव हा यशाची पहिली पायरी होती असे समजून काम करावे लागणार आहे.

भाजपचे आमदार असलेल्या स्वपक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विधानसभेला मदत केलेले विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्ते विरोधात जाऊन

भालके गट, राष्ट्रवादी, काँग्रेस गटाच्या सहकार्याने “समविचारी” आघाडी स्थापन करत या आघाडीने आमदार अवताडे यांना एकाकी पाडत त्यांच्याकडून कारखाना काढून घेतला आहे.

त्यामुळे आता आगामी काळात आमदार अवताडे यांना गावोगावी स्वतःची निष्ठावान व जनमतातील कार्यकर्त्याची स्वतंत्र फौज उभी करून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत कार्यकर्त्यांची मोळी घट्ट बांधली तरच आगामी काळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.

मंगळवेढा तालुक्याने नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व दिले आहे. याअगोदरही तालुक्यात आवताडे ज्या पक्षाकडे त्या पक्षाचे पारडे नेहमीच जड असायचे,

मात्र मधल्या काळामध्ये आमदार समाधान आवताडे व त्यांचे चुलते बबनराव अवताडे यांच्यात फाटाफुट झाल्यामुळे समविचारी आघाडीतील नेत्यांनी बबनराव अवताडे यांना सोबत घेत समविचारी आघाडीने मोळी बांधून भक्कम गट स्थापन केला.

व ऐनवेळी बबनराव अवताडे यांनाच बाजूला करून समचारी आघाडीने ही निवडणूक लढवली त्यामुळे बबनराव अवताडे व समाधान आवताडे यांना मनोमिलन करावे लागले असले तरी या मनोमिलनाला थोडा उशीर झाल्याचे ही जाणकार सांगत आहेत.

सहा वर्षे दामाजी कारखान्याचा एकहाती कारभार करत शेतकऱ्यांना दहा रुपये किलोने साखर दिली, अपघाती विमा सुरू करून अनेक सभासद कामगारांना मदत केली शेजारचे कारखाने बंद पडले असताना यांनी कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला.

मात्र विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आ.आवताडे कमी पडले, आरोपांचे खंडन करण्यापेक्षा मी सहा वर्षात काय काम केले आणि पुढे सत्ता आल्यास काय करणार हेच ते प्रचारात सांगत बसले पण ते सभासदांना पचनी पडले नाही.

त्यामुळे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपयश आले असले तरी या कारखान्याचे अपयशी यशाचीच एक पायरी आहे असे समजून त्यांना काम करावे लागणार आहे.

राजकारणात जास्त सरळमार्गी राहून चालत नाही असे काही अनुभवी लोक सांगतात हा सल्ला त्यांना मान्य करावा लागणार आहे. कारण जो-जो येईल त्याला ते आपलाच समजतात पण जवळ आलेला माणूस कोणत्या उद्देशाने आला आहे याची खातरजमा करणे गरजेचे असते.

‘कामापूरते मागे पुढे करायचे आणि निवडणूक लागली की विरोधात जायचं’ असं वागणाऱ्या लोकांची संख्या त्यांच्या आसपास जास्त दिसते आशा लोकांना ही वेळीच त्यांच्या कार्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

राजकारणात समाधान आवताडे यांची पाटी कोरी आहे दामाजी करखान्याव्यतिरिक्त त्यांच्यावर आरोप करण्यासारखे दुसरे काही साधन विरोधकाकडे नव्हते प्रत्येक निवडणुक काळात कारखान्याच्या माध्यमातूनच अवताडे यांच्यावर अनेक आरोप विरोधकांकडून केले जायचे.

मात्र आता कारखाना ही हाती नसल्यामुळे विरोधकांना आरोप करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागणार आहेत.

आगामी काळात मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजना,बसवेश्वर स्मारक, रस्ते, आरोग्य,पाणी या समस्यांकडे भर देत तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न ,बेरोजगारी , नगरपालिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भर देऊन जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याची संधी त्यांना आहे.

ठराविक कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला येत सर्वसामान्य लोकांत मिसळून आमदार अवताडे यांनी काम करणे गरजेचे आहे.

कायम गाडीत असणाऱ्या डिजिटल पुढाऱ्यांकडून ग्राउंड रिपोर्ट घेऊन अंदाज बांधण्यापेक्षा तळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेत काम करणे गरजेचे आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्या निवडणुकांना सामोरे जाताना आमदार अवताडे यांनी स्टार्चचे कपडे घालून मागेपुढे करणाऱ्या डिजिटल नेत्यापेक्षा सामान्य माणसाच्या व्यथा जाणून घेऊन जनमानसात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देत त्यांची मोळी बांधली तर आमदार अवताडे यांचा झंझावात कोणीही रोखू शकणार नाही असे जाणकारांचे मत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Next Post
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

विद्यार्थ्यांनो! नवे शैक्षणिक वर्ष 'या' मुलांना मिळणार साडेसात लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; जाणून घ्या अधिक माहिती

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा