टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागले आहेत.
दक्षिण भागांमध्ये माजी चेअरमन नंदकुमार पवार वकील यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली सत्ताधारी गटाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले आहे. त्यांचे आर्थिक नुकसान केले आहे.
एका शेतकऱ्याचे सात ते आठ लाख रुपये नुकसान केले आहे असा खळबळजनक आरोप पवार वकील यांनी केला आहे.
आता शेतकऱ्यांनी सभासदांनी या सत्ताधारी अवताडे गटाविरुद्ध बंड करण्याची गरज आहे. प्रचाराला आल्यानंतर आमदार अवताडे व उमेदवारांना समोर उभे राहून विचारणा करा आमचे उसाचे बिल का दिले नाही,
आम्हाला टोळ्या का दिल्या नाहीत कामगारांचा पगार का केला नाही असा खडा सवाल निवडणुकीत निवडणुकीला सामोरे जा कामगारांचे देखील या सत्ताधारी गटाने मोठे नुकसान केले आहे.
सगळे कामगार सत्ताधारी गटाविरुद्ध गेलेले आहेत, काही अपवाद वगळता सर्व कामगार विरोधात गेलेले आहेत मला दररोज ६० ते ७० फोन येतात सत्ताधारी गटाविरुद्ध मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे.
या निवडणुकीत मतदानासाठी पाच हजार रुपये देतील परंतु तुम्ही तुमच्या मताची किंमत ५००० करू नका लाखो रुपये किमतीचा शेअर्स आहे. तुमचा यामुळे सत्ताधारी गट आर्थिक दृष्ट्या प्रबळ असल्यामुळे
सत्तेत धुंद झाला आहे. याना सत्तेवरून दूर करण्याची गरज आहे ती तुम्ही सर्व सभासदांनी एकत्र येऊन हे करा असे आव्हान करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज