mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 22, 2022
in राजकारण, राज्य
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरेंची ही सभा पार पडली.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त सांगावं त्यांच्यावर एक तरी केस आंदोलनाची आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसंच राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले.

पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का? मराठीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो एक तरी केस आहे का?, परवा संभाजीनगरच्या नामांतरावरुन राज ठाकरेंनी तुम्ही सरदार पटेल की महात्मा गांधी आहे.

मी बोलतोय ला काय लॉजिक आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. पुढे राज ठाकरे म्हणाले की, केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, असा सवाल उपस्थित केला. तसंच संभाजीनगरचं भाषांतर झालं तर कशा वर बोलायचं, असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

संभाजीनगर, जालना आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी येत नसल्यचं ते म्हणालेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो की, त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.

राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे. निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

पुण्यातल्या अनेक मैदानांनी सभांना नकार दिला. आता आम्हाला मैदान नाही, तर कुणालाच द्यायचं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं?, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे.

तसंच पावसाच्या शक्यतेमुळे हॉलमध्ये सभा घेत असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली होती. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या होत्या.

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज ही सभा पार पडली. या सभेसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

सभेला सुरवात होताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले कि, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे ते म्हणाले कि, नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पुणे सभाराज ठाकरे

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
Next Post
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा