टीम मंगळवेढा टाईम्स ।
यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्यांच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी सांगोला पोलीस स्टेशनला आलेल्या दोन्ही गटाच्या जमावाने तुंबळ हाणामारी केली.
पोलीस स्टेशनच्या आवारात झटापट करणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दमदाटी ही घटना रात्री ११ च्या सुमारास सांगोला पोलीस स्टेशन आवारात घडली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोळेकर यांनी नरळेवाडी व लक्ष्मीनगर (ता.सांगोला) येथील दोन्ही गटाच्या १ ९ जणांवर गुन्हा दाखल केला.
लक्ष्मीनगर (ता.सांगोला) येथील श्रीकांत आदिनाथ आटपाडकर हे त्यांना झालेल्या मारहाणीविरुद्ध तक्रार देत असताना ‘त्या’ पार्टीच्या लोकांनी आम्हाला तक्रार नोंद करायची आहे, असे ठाणे अंमलदार यांना सांगितले.
त्यावेळी त्यांनी समोरची तक्रार नोंद झाल्यानंतर तुझीही तक्रार घेतो, असे म्हणाले. यावेळी सरदार श्रीकांत आटपाडकर व त्यांच्यासोबत आलेले प्रदीप आटपाडकर,
दत्तात्रय आटपाडकरसह दोन ते चार इसम व तक्रार देण्यासाठी आलेले विरुद्ध पार्टीचे लोक एकमेकांना शिवीगाळ , दमदाटी करू लागले पोलिसांना काही कळण्याच्या आत ते एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन मारहाण करू लागले.
त्यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाणे आवारात दंगा करू नका, एकमेकांसोबत भांडण करू नका, रितसर तक्रार द्या , असे वारंवार बजावले.
पोलिसांचा आदेश न जुमानता तुंबळ हाणामारी करू लागले. त्यावेळी रात्र गस्तीवरील सपोनि प्रशांत हुले, पोना बाबासाहेब पाटील, नागेश निंबाळकर, पोकॉ राजू माने, अमर पाटील, गणेश कुलकर्णी यांनी त्यांची भांडणे सोडविली.
दरम्यान, पोलिसांनी दोन गटात भांडण झाल्यामुळे त्यांच्याकडून आणखी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता गृहीत धरून जमावातील काही इसमांना ताब्यात घेतले.
यावेळी प्रदीप आटपाडकर याने तुम्हाला सर्वांना दाखवतो, पोलीस काय करणार आहेत. येथून त्यांची बदली करतो, ते कसे काम करतात तेच पाहतो, असे मोठ्याने बोलून अनिल आटपाडकर, गणेश आटपाडकर पोलिसांची नजर चुकवून पळून गेले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज