mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी घडामोड! देवेंद्र फडणवीस हाजीर हो…! पोलिसांची फडणवीसांना नोटीस; नेमकं काय घडलं? वाचा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2022
in राजकारण, राज्य
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत एक स्टिंग ऑपरेशन समोर आणले होते.

या स्टिंग ऑपरेशनमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली – देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली.

कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सीक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला.

ऑफिशिअल सीक्रेट ऍक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली.

पोलीस चौकशीला सामोरं जाणार

उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे. पोलीस चौकशीला सामोरं जाणार ही सगळी माहिती मी भारत सरकार गृहसचिवांनी दिली आहे. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली.

माझ्याकडे पुरावे आहेत

माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाहीये. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार, पोलिसांना सहकार्य करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाचा : देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; घडाळ्यात ‘तो’ छुपा कॅमेरा कोणी लावला?

स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? प्रवीण चव्हाण म्हणाले…. हा अहवाल 6 महिने सरकारकडे पडला होता, त्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. मग सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर ? हा माझा सवाल आहे.

CRPC 160 ची नोटीस

राज्य सरकार नं केलेल्या षड्यंत्रचा भांडाफोड मी परवा केला म्हणून काही सुचत नसल्यानं त्यांनी मला ही नोटीस दिली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. CRPC 160 ची नोटीस आहे. बदली घोटाळा मी उघडकीस आणला, त्यासंदर्भात नोटीस आहे. मी गृहमंत्री होतो, पण मी पोलिसांना तपासात सहकार्य करणार, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार.

या संदर्भात सीबीआय चौकशी सुरू असून तपासात सत्य समोर येणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आज 12 मार्च आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, मुंबईचा बॉम्बस्फोट हा 12 मार्च रोजी झाला होता. आता 3 दशकं झाली तरी त्याचे आपल्या मनावर घाव कायम आहेत.

12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत याबाबत मी खंत व्यक्त करतो.(स्रोत:News 18 लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 22, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

करामती! शेतकऱ्यांनी केली चक्क अफूची शेती, 14 लाख किमतीचा अफू जप्त; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा