mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चार राज्यातील भाजपच्या विजयाचा ठाकरे सरकारवर परिणाम होणार? शरद पवारांचं उत्तर वाचा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 10, 2022
in राजकारण, राज्य
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भाजपने उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशसहीत इतर राज्यात भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे.

फक्त पंजाबचा निकाल वेगळा लागला आहे, असं सांगतानाच सत्ता बदलासाठी त्यांना आणखी अडीच वर्ष थांबावं लागेल. त्यानंतर त्यांना दिसेल.

माझी खात्री आहे आता जो निकाल लागला तो लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे नेते अधिक जबाबदारीने कामाला लागतील.

त्यामुळे अधिक चित्रं चांगलं दिसेल. राज्यातील आघाडी सरकार टिकेल आणि त्यानंतर पुन्हा सक्सेस होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

पाच राज्यांचे निकाल जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे एक वेगळं चित्रं पाहायला मिळत आहे.

पण पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाही. मात्र काँग्रेसला झटका देणारा हा बदल आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी ज्या प्रकारचं यश संपादन केलं आणि ज्या प्रकारे प्रशासन सांभाळलं त्याबद्दल दिल्लीच्या लोकांनी त्यांना पावती दिली.

पंजाब हे दिल्लीच्या शेजारचं राज्य आहे. त्यामुळे दिल्लीतील कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला. तसेच पंजाब सोडलं तर इतर राज्यात जे पक्ष आहेत. त्यांनाच मतदारांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे इतर राज्यात भाजपचं सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे, असं शरद पवार म्हणाले.

किमान समान कार्यक्रमावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेसला निवडणुकीत चांगला रिझल्ट द्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलं.

इतर राजकीय पक्षाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. त्यांनीच त्यांचा विचार करावा. मला वाटतं काँग्रेस त्याबाबत विचार करेल, असंही ते म्हणाले.

ईव्हीएमचा घोळ नाही

मात्र, ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. ईव्हीएम बाबत काही लोकांच्या तक्रारी आहेत. पण मी त्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा आम्ही ईव्हीएवर बोलत नाही. हरल्यावर ईव्हीएमबाबत बोलतो.

काही लोकांच्या तक्रारी आहेत. आमच्यासमोर प्रेझेंटेन्शन दिलं होतं. पण असाच निकाल का लागला हे मी मान्य करत नाही, असं सांगतानाच अखिलेश यादव यांच्या पक्षाला मोठ्या जागा मिळाल्या आहेत. त्या दुर्लक्षित करता येत नाही. त्यांना सत्ता मिळाली नाही. पण त्यांना मोठा आकडा मिळाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

गोव्यातील राष्ट्रवादीच्या पराभवाला पवार यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तृणमूलने ऐनवेळी गोव्याच्या निवडणुकीत प्रवेश केला. एकदम सर्व जागा लढवायच्या आणि अन्य पक्षाचे लोक घेऊन जागा लढवायच्या हे जर तृणमूलने टाळलं असतं तर बरं झालं असतं. उदाहणार्थ माझ्या पक्षाचा एकच आमदार होता. चर्चिल हे त्याचं नाव.

तृणमूलने गोव्यात लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर पक्षाच्या लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे चर्चिल त्यांच्या पक्षात गेला.

या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या राज्यात स्थान नसताना एखाद्या पक्षाने संबंध सर्वच्या सर्व जागा लढवायच्या आणि तिथल्या स्थानिक आणि अन्य विरोधी पक्षांशी सुसंवाद ठेवायचा नाही याचे दुष्परिणाम होत असतात. त्यांनाच नव्हे तर इतर पक्षांनाही ते सहन करावे लागते, अशा शब्दात पवारांनी तृणमूल काँग्रेसला फटकारले.

त्याला तोंड द्यायचं आहे

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर राज्यातील ईडीच्या कारवाया वाढतील का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, ईडी सीबीआयच्या कारवाया सुरूच आहे.

अनिल देशमुखांच्या घरी 90 धाडी मारल्या. एका व्यक्तीच्या घरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 90 धाडी मारण्याचा नवीन कार्यक्रम दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी घेतला आहे. त्याला तोंड द्यायचं आहे, असंही ते म्हणाले.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

Breaking! मंगळवेढ्यात अपघात तरुणाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा