mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अनेकांच्या उंचावल्या भुवया! नॉट रिचेबल असलेले भगीरथ भालके बबनराव आवताडे यांच्या सोबतीने मंगळवेढ्यातून झाले रिचेबल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 16, 2022
in मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल झालेले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके जिल्हा दूध संघाचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठनेते बबनराव आवताडे यांच्या सोबतीने मंगळवेढ्यात सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या आगमनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्व.भारत भालके यांनी ११ वर्षात तीन वेगवेगळ्या पक्षातून आमदारकी मिळताना कायमस्वरूपी जनतेलाच आपला पक्ष मानले.

परंतु त्यांच्या पश्चात ही जागा राखताना अपयश आल्यामुळे भगीरथ भालके गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल झाले होते.

भगीरथ भालके सक्रिय नसल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या. दोन दिवसापूर्वी त्यांच्या समर्थकांनी सरकोली (ता . पंढरपूर) येथे जाऊन आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सक्रिय होण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार शुक्रवारी भालके हे मंगळवेढा येथे जिल्हा दूध संघाची बैठकीला उपस्थित राहिले तत्पूर्वी संपर्क कार्यालयात उपस्थित सभासदांना त्यांनी मार्गदर्शनही केले.

या बैठकीला माजीमंत्री दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, ज्येष्ठनेते बबनराव आवताडे चंद्रकांत देशमुख, सुरेश हसापूरे, राहुल शहा, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, लतीफ तांबोळी यांच्या बरोबर भालके यांनी समर्थकांसह उपस्थिती लावली.

यामुळे समर्थकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तर तालुक्यातून ७२ सभासद असलेल्या बैठकीस आज जवळपास ५० सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्याचे नेते बबनराव आवताडे यांच्या बरोबरीने जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सक्रिय राहताना संस्थेवर आपले वर्चस्व कसे राहील यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत.

एकूणच आगामी राजकारणात भगीरथ भालके हे बबनराव आवताडे यांच्या बरोबरीने राजकीय गटबांधणी करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

युटोपियन शुगर येथे समविचारी गटाची बैठक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून मंगळवेढा तालुक्यातील दुध संस्थांच्या प्रतिनिधींची तसेच समविचारी आघाडीची विचारविनिमय करण्यासाठीची बैठक कचरेवाडी युटोपियन शुगर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली जिल्हा दूध संघाची अंतिम यादी प्रसिध्द झाली असून

जिल्ह्यातील एकूण ३१६ दूध संस्थापैकी मंगळवेढा तालुक्यातील ७२ दूध संस्थांच्या प्रतिनिधीना मतदानाचा हक्क मिळाला आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या गटाच्या एकूण ५० ते  ५५ दूध संस्थांचे ठराव असून त्यापैकी बैठकीस ४१ दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा दूध संघाचे माजी संचालक औदुंबर वाडदेकर , शिवाजीराव नागणे यांनी मानोगत व्यक्त केले.

यावेळी जयंत साळे , पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , दामाजी शुगरचे संचालक सुरेश भाकरे , विजय माने , पप्पू काकेकर , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेव जानकर,

धनंजय पाटील , येताळा भगत , अण्णा पाटील , महादेव लुगडे , पप्पू स्वामी , दिगंबर भाकरे यांच्यासह दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते . आभार जयंत साळे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भगीरथ भालके

संबंधित बातम्या

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 29, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Next Post

Breaking! 'फटे स्कॅम' प्रकरणी पहिली अटक; दोघांना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा