mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात यावे म्हणून उभारलेला लढा सार्थकी लागल्याने समाधान वाटले : शैलाताई गोडसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

 

टीम मंगळवेढा टाईम्स । म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात सोडावे म्हणून शिरनांदगी सारख्या दुर्गम भागात, ऐन थंडीत, तलावातच आंदोलन केले. आज शिरनांदगी तलावातील पाणी पाहून त्यावेळी पाण्यासाठी उभारलेला लढा सार्थकी लागल्याचे समाधान वाटत आहे असे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे यांनी व्यक्त केले. 

शैला गोडसे यांनी  शिरनांदगी तलावात आलेले पाणी पूजन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना ग्राहक पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता कळकुंबे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी तालुकाप्रमुख सुशीला सलगर, बंडू गडदे, उत्तम काशीद, भोजलिंग जानकर,  बयाजी जानकर, हरिदास खांडेकर, धनाजी खताळ, सुरज काशीद, अंबादास घाडगे, सुग्रीव पाटील हे उपस्थित होते.

गोडसे पुढे म्हणाल्या, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यास प्रशासनाच्यावतीने चालढकल करण्यात येत होती. म्हणून आम्ही तलावातच आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी शिरनांदगी तलावात येऊन पाणी सोडण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते पण जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कालवा फोडून पाणी इतरत्र वळविल्यामुळे त्या वेळी पाणी शिरनांदगी तलावापर्यंत पोहोचतो शकले नाही. 

यानंतर ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येऊन सांगली जिल्ह्यातील लोकांचे हाल होते. हे पाणी दुष्काळग्रस्त मंगळवेढा तालुक्याला द्यावे  ही मागणी आम्ही केली. आणि गेले वर्षभर त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यावेळी केलेले आंदोलन व पाठपुरावा याचे फलित म्हणून आज शिरनांदगी तलावात आलेले पाणी पाहून आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करु शकलो याचा मनापासून आनंद वाटत आहे.

आठ गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

म्हैसाळ योजनेचे मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या लवंगी, आसबेवाडी, सलगर (खू.), सलगर (बु), शिवनगी, सोड्डी, येळगी, हुलजंती या आठ गावांच्या सीमेवरुन जात होते पण या गावांना म्हैसाळचे पाणी मिळत नव्हते. म्हणून या आठ गावांचा नव्याने समावेश होण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला. 

या गावांचा समावेश होण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. आता या गावांचा समावेश पूर्णतः होण्यासाठी आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच मंगळवेढा तालुका हे म्हैसाळ योजनेचे शेवटचे टोक आहे. त्यामुळे दरवर्षी पाणी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.:-शैला गोडसे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी

Satisfied with the success of the fight to get the water of Mahisal into Shirnandagi Lake Shailatai Godse

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही; ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला

प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही; ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा