टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डाेणज येथील महासिद्ध देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाख रुपये चाेरून नेल्या प्रकरणी राजेंद्र गणपत केदार याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी प्रकाश पुजारी हे महासिद्ध देवस्थान मंदिराचे पुजारी असून गेली चार वर्षापासून ते पुजारी म्हणून काम पहात आहेत,
दिनांक २८ रोजी सायंकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे देवाची पूजा फिर्यादीने केली. गावातील राजेंद्र केदार तो मंदिरात येऊन कट्टयावर बसला हाेता.
फिर्यादी ७ वाजता मंदिर बंद करून कुलूप लावून ते घरी गेले हाेते.सदर आराेपी केदारवर चाेरीचे वेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने माहिती असल्याने तो मंदिरात आल्यामुळे फिर्यादीस संशय आला होता.
फिर्यादी हे पुन्हा सायंकाळी ८.३० वाजता मंदिराकडे आले असता त्यांना मंदिराचे कूलुप तुटलेले दिसले व दरवाजा उघडा दिसला त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता तो बॅगेत नोटा व चिल्लर भरत असताना निदर्शनास आले,
काय करतो असे विचारल्यावर काही न बोलता तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये पैसे घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हठले आहे.
मंदिर समितीचे सचिव चन्नापा बिराजदार यांना घटनेची माहीती देन्यात आली.घटनास्थळी बाेराळे बिटचे पाेलीस हवालदार महेश काेळी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहीती जानुन घेतली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज