mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

E-Pass न मिळाल्यानं वेटरची आत्महत्या? दोन महिने हॉटेलमध्ये लटकत होता मृतदेह; सोलापूर जिल्हयातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
E-Pass न मिळाल्यानं वेटरची आत्महत्या? दोन महिने हॉटेलमध्ये लटकत होता मृतदेह; सोलापूर जिल्हयातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका हॉटेलमध्ये वेटरनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ शहरात असलेल्या रुची हॉटेलमधील किचनमध्ये कुजलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह आढळला आहे. हॉटेलमधून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.


कुलदीपसिंग मरावी असे या आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असून तो मुळचा मध्यप्रदेशचा रहिवासी होता. लॉकडाऊन काळात हॉटेल बंद असल्यानं हॉटेलमध्ये एकूण तीन कामगार मुक्कामी होते. मात्र, त्यापैकी दोघांना ई-पास मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या मुळ गावी निघून गेले होते.

सोलापूर! दोन महिने हॉटेलमध्येच लटकत होता मृतदेह; मोहोळमध्ये कामगाराची आत्महत्या@SpSolapurRural @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra @CMOMaharashtra @YashwantManeNCP @bharanemamaNCP pic.twitter.com/P7ck8zswPA

— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 30, 2020

सोलापूर – पुणे रोडवरील मोहोळ शहरानजीक बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये हॉटेल कामगाराने लॉकडाऊनच्या काळात गावाकडे जाण्याची सोय झाली नाही तर येथे खाण्यापिण्याची ही सोय झााली नाही म्हणुन बंद असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मागील दोन – अडीच महिन्यापासुन मृतदेह लटकत राहिल्याने आपोपाप त्याचे मुंडके गळुन बाजुला पडल्याचे दिसून आले .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रूची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन बंद होते. हॉटेलच्या मूळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते. २४ मार्चपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. या हॉटेलात तिघे कामगार परराज्यातील होते. परंतू गावाकडे जाण्यासाठी दोन कामगारांना पास मिळाला एकास पास न मिळाल्याने तो हॉटेलमधेच राहिला होता.


लॉकडाऊनच्या काळात काही दिवस त्याने मिळेल त्या जेवनावर काढले त्यानंतर खाण्यापिण्याची सोय झाली नाही म्हणुन त्याने वैतागुन हॉटेलच्या किचनमधेच अँगलला साडी बांधुन गळफास घेतला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गधी येत असल्याची माहिती पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता हा प्रकार उघडकीस आला असून त्यांच्या जवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली आहे. त्याचे नांव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. बाडीवाले, ढाकणे, व्ही.जी. माने, ए.जी बोरकर, ए.ई. जाधव तपास करीत आहेत.

The body had been hanging in the hotel for two months;  Suicide of a worker in Mohol

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराष्ट्रात रविवारी १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात रविवारी १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा