mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! आता सुटी दिवशीही शाळा सुरू असणार; ‘या’ विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 21, 2021
in राज्य, शैक्षणिक
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चपासून सुरू होणार आहेत.परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण व्हावा, यासाठी आता रविवारी सुटी दिवशीही शाळा भरवाव्या लागणार आहेत.

स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन तसा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जूनपासून ऑफलाइन शाळा सुरू झाल्याच नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच दुसरीकडे प्रतिबंधित लसीकरणाचा वेगही वाढत होता. त्यामुळे ऑक्‍टोबरपासून दहावी-बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाले.

तरीही, अनेक विद्यार्थी शाळेला जात नव्हते. परंतु, 23 नोव्हेंबरपासून सर्वच शाळा ऑफलाइन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली. तरीही, एसटी वाहतूक बंद असल्याने खेड्या-पाड्यातील मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

विविध अडचणींमुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहावे लागले. अनेकांना ऑनलाइन शिक्षण पचनी पडले नाही. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा एकदा पूर्वी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा लागणार आहे.

तत्पूर्वी, शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. बारावीची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर लगेचच लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अशा परिस्थितीत आता सुटी दिवशीही विशेषत: ग्रामीण भागातील संपूर्ण विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची साधने उपलब्ध नसल्याने ऑफलाइन शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत.

परंतु, वरिष्ठ स्तरावरून लेखी आदेश नसल्याने आम्ही कसा निर्णय घेऊ, असेही काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. शालेय शिक्षण विभागातील या गोंधळात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.(स्रोत:सकाळ)

सुटी दिवशीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी शिकवून पूर्ण होईल की नाही, यासंदर्भात मुख्याध्यापकांनी आढावा घ्यावा. त्यानुसार ते स्थानिक परिस्थिती पाहून सुटी दिवशीही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.- दत्तात्रय जगताप, संचालक, माध्यमिक शिक्षण, पुणे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी-बारावीरविवारीशाळा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

कामाची बातमी! लाडक्या बहिणींनो ही चूक अजिबात करू नका; अन्यथा अफवेला पडाल बळी

May 20, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

May 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ…

May 18, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

May 18, 2026
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

हार-शाल नव्हे, आता ‘झाड’ भेट द्या! ‘सावली निवास’वर रंगणार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा पर्यावरणपूरक वाढदिवस सोहळा; निसर्गाला प्राणवायू देण्याचा कार्यकर्त्यांचा मोठा संकल्प

May 18, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण

May 17, 2026
सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाची गरज; शेतकऱ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! विमानासारखं सीट बुकिंग आणि ५ पटीने जास्त स्पीड; काय आहे रेल्वेचा नवा प्लॅन? रेल्वे प्रवासात मोठा बदल

May 17, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! सद्‌गुरुंच्या बैठकीहून पत्नीला आणण्यासाठी निघाले; पण वाटेतच कारने घेतला जीव; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

कामाची बातमी! लाडक्या बहिणींनो ही चूक अजिबात करू नका; अन्यथा अफवेला पडाल बळी

May 20, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 19, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! AC पासून ते WFH पर्यंत…,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन, VIDEO तून महत्त्वाचा संदेश

May 19, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा