mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

१४ मोटारसायकलींसह दोघा संशयित चोरांना पकडले; सांगोला पोलिसांची कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2021
in क्राईम, सोलापूर
थरार नाटय! मंगळवेढा शहरातील भर चौकात एकावर खुनीहल्ल्या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

टीम मंगळवेढा टाइम्स ।

चोरलेल्या १४ मोटारसायकलसह २ आरोपीस सांगोला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. ही कारवाई मेडशिंगी ( ता . सांगोला ) येथील आरोपीच्या वस्तीवर केली असून,

मोटारसायकल चोर सत्यवान बजरंग इंगवले (वय २९, रा.मेडशिंगी, ता.सांगोला) व रोहन मारुती गायकवाड (रा.मांजरी (बु .) , हडपसर , पुणे ) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रजनीकांत बापू सूर्यगंध ( रा . वाढेगाव , ता . सांगोला ) यांची मोटारसायकल दि . १० जुलै रोजी सांगोला येथील सोनलकर यांच्या हॉस्पिटल समोरून चोरीस गेली होती.

याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान अज्ञात आरोपीचा पोलीस सांगोला परिसरात तपास घेत असताना सत्यवान बजरंग इंगवले हा मोटारसायकल चोऱ्या करीत असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली होती

मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर आरोपीच्या राहते घरी ( मेडशिंगी ) येथे जाऊन शोध घेतला असता सत्यवान इंगवले हा घरीच होता.

यावेळी पोलिसांनी घराच्या आसपासच्या परिसराचा शोध घेत असताना त्याचे घराशेजारी असलेल्या शेतीच्या बांधालगत लावलेल्या मोटारसायकली दिसून आल्या.

सदर मोटारसायकली बाबत आरोपीकडे विचारणा केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याचे घराजवळ आढळून आलेल्या हिरो पॅशन प्रो २ , हिरो होंडा स्प्लेनंडर १ , शाईन २ ,

होंडा अॅक्टिवा २ , टिव्हीएस ज्युपीटर २ , युनिकॉर्न २ , ड्रीम निवो १ व स्प्लेन्डर प्लस २ अश्या एकूण सुमारे ७ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या १४ मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत .

सदर गाड्या कोठून चोरल्या याबाबत पोलिसांनी कसून विचारणा केली असता आरोपी सत्यवान इंगवले याने मोटारसायकल चोरण्याकरिता सोबत असलेल्या आरोपी रोहन मारुती गायकवाड (वय २३ , रा . मांजरी ( बु ) , हडपसर , जि . पुणे ) याचे नाव सांगितले असता त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपीसह ७ लाख १५ हजार किमतीच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव साहेब ,

उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघ करीत असून त्यांना शहर बीट व डी.बी. पथकातील सपोनि नागेश यमगर पोहेकॉ काझी , पोना राहुल कोरे , हेंबाडे पाटील व सायबर पोलिस ठाण्याचे अन्वर आतार यांनी मदत करून सदर मुद्देमाल हस्तगत केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोटारसायकल

संबंधित बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
Next Post
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

सोलापुरात असदुद्दीन औवेसींच्या गाडीवर कारवाई; वाहतूक पोलिसाला मिळालं 'हे' बक्षीस

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..