mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बाबो..! नातेवाइकांना भेटण्यासाठी चालकाने पळवली चक्क एसटी बस; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2021
in क्राईम, सोलापूर
प्रवाशांनो! एस.टी बस कुठे आहे, किती वेळात येणार याची माहिती आता मोबाईलवर समजणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर एसटी स्थानकातून वीस वर्षे सुरक्षित सेवा केलेल्या शरणप्पा बेनुरे या चालकाने मद्यधुंद अवस्थेत एसटी गाडी पळवली.

याप्रकरणी बेनुरे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याने दारूच्या नशेमध्ये नातेवाइकांना भेटण्यासाठी एसटीने तेलगाव गेल्याची माहिती तपासात मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे सर्व एसटी गाड्या बंद आहेत; पण नातेवाइकांना भेटण्यासाठी आरोपी बेनुरे याने दारूच्या नशेमध्ये चक्क एसटी गाडी घेऊन तेलगाव येथील पाहुण्यांच्या घरी भेटायला गेला.

हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गाडीचा शोध सुरू केला. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्या चालकाला तेलगाव गावाजवळ पकडले.

त्याला मंद्रुप पोलिसांनी फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे हे करत आहेत.

मास्टरचावीने पळवली गाडी

एसटी गाड्यांच्या चालकांकडे एक मास्टर चावी असते. या मास्टर चावीने बेनुरे याने गाडी काढली व थेट मंद्रूपमार्गे तेलगावकडे निघाला.

दरम्यान, पोलिसांनी त्याचा शोध घेत ही गाडी अडवली. त्यानंतर रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, त्या एसटी चालकाची चौकशी होणार असून त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बेनुरेची चोवीस वर्षे सेवा

एसटीमधील चालकांना विना अपघात प्रवाशांना सुखरूप आपल्या इच्छितस्थळी सोडल्यानंतर त्या चालकांचा प्रत्येक पाच वर्षांनंतर सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो.

बेनुरे याने एसटीमध्ये आतापर्यंत २४ वर्षे सेवा बजावली आहे. त्यात त्याने २० वर्षे सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्याचा बिल्ला देऊन सत्कार ही करण्यात आला आहे.

त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली; पण तेलगावपर्यंत विनाअपघात त्याने गाडी नेल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.(स्त्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एसटी बसपळवलीसोलापूर

संबंधित बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

मोदी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देण्याच्या तयारीत; यांना होणार फायदा

ताज्या बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा