mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 8, 2021
in राज्य, राष्ट्रीय, सोलापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंढरपुरात पालखी मार्गांचे भूमिपूजन; कसा असेल सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.

या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असेल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा असणार आहे.

प्रधानमंत्री श्री @narendramodi जी महाराष्ट्र और पंढरपुरवासियों को दे रहे नई सौगात। 8 नवंबर, सोमवार को पालकी मार्ग परियोजनाओं के शिलान्यास के साथ अन्य राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का होगा लोकार्पण। #PragatiKaHighway pic.twitter.com/OwRb2Estcd

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 7, 2021

आज दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे.

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथाची निर्मिती

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जाणार आहेत.

त्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किलोमीटर,

तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे 130 किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. (स्रोत:TV9 मराठी)

पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचे लोकार्पण

भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील.

त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उद्घाटनपंढरपूरपंतप्रधान नरेंद्र मोदीपालखी मार्ग

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 29, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..